सेंट झेविअर्स कॉलेजच्या 150 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मराठी प्राचार्य

मुंबईच्या विख्यात सेंट झेविअर्स कॉलेजच्या इतिहासात पहिल्यांदाच मराठी आणि ख्रिश्चन नसलेल्या व्यक्तीची प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 25, 2018 06:04 PM IST

सेंट झेविअर्स कॉलेजच्या 150 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मराठी प्राचार्य

मुंबई,ता. 25 जुलै : मुंबईच्या विख्यात सेंट झेविअर्स कॉलेजच्या इतिहासात पहिल्यांदाच मराठी आणि ख्रिश्चन नसलेल्या व्यक्तीची प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजेंद्र शिंदे असं त्यांच नाव असून शिंदे हे झेविअर्सच्या बॉटनी विभागाचे प्रमुख आहेत. गेल्या 35 वर्षांपासून ते कॉलेजमध्ये प्राध्यापक असून ते या कॉलेजचे 24 वे प्राचार्य आहे. शिंदे हे 1 सप्टेंबरपासून आपला कार्यभार स्वीकारतील असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

सेंट झेविअर्सचा सर्व कारभार हा ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून चालवला जातो. अशाच प्रकारे दिल्ली,चेन्नई आणि कोलकत्यालाही ख्रिश्नच कॉलेजेस असून तिथे अजुनही ख्रिश्चनेतर प्राचार्यांची नियुक्ती झाली नाही. या कॉलेजेसच्या प्राचार्य पदावर ख्रश्चन व्यक्तिंनाच प्राधान्य दिलं जातं.

चर्चा अर्जुन तेंडुलकरची, पण भाव खाल्ला अकोल्याच्या अर्थवने!

VIDEO : सलमानच्या गाण्यावर टायगर श्राॅफच्या डान्सचा अनोखा अंदाज

मुंबईतल्या कॉलेजच्या संचालक मंडळाने पहिल्यांदाच हा संकेत मोडत नियुक्ती केली आहे. शिंदे हे 1983 पासून कॉलेजशी संबंधीत असून 2011 मध्ये त्यांची उपप्राचार्य म्हणून नियुक्ती झाली होती. महाविद्यालयाचे परिक्षा नियंत्रक तसच विविध पदांवर त्यांनी उत्तमपणे काम केलं आहे. नाशिक जिल्ह्यातलं वणी हे त्यांचं मुळ गाव आहे.

Loading...

चर्चेला तयार!,तीन दिवसांनंतर मुख्यमंत्री मराठा मोर्च्यावर बोलले

1980 मध्ये त्यांनी या कॉलेजमध्ये विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला होता.सेंट झिविअर्स कॉलेजचा मुंबईत दबदबा असून तिथे प्रवेश घेण्यासाठी विद्यांर्थ्यांमध्ये चढाओढ असते. उत्तम दर्जा, शिस्त, सतत नाविण्याचा ध्यास आणि विद्यार्थी प्रिय धोरण यासाठी हे कॉलेज ओळखलं जातं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 25, 2018 06:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...