आईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं!

आईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं!

अटक केलेल्या तरुणाला आईचे अनैतिक संबंध असल्याचा संशयानंतर आईची हत्या केली आहे. परवेझ शेख नावाच्या एका व्यक्तीशी आईचे संबंध असल्याचा मुलाला संशय होता.

  • Share this:

मुंबई, 22 ऑक्टोबर : सध्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. आताही मुंबईमध्ये एक धक्कादायक गुन्ह्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईत आईच्या कथित प्रियकर (खून) च्या हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी मुंबईच्यावांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स बस स्थानकात एका 21 वर्षीय व्यक्तीला अटक केली. ज्या आईने जन्म दिला त्याच आईची मुलाने हत्या केल्यामुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या तरुणाला आईचे अनैतिक  संबंध असल्याचा संशयानंतर आईची हत्या केली आहे. परवेझ शेख नावाच्या एका व्यक्तीशी आईचे संबंध असल्याचा मुलाला संशय होता. सोमवारी रात्री दहा वाजता ही घटना घडली. जेव्हा मृत आई बस स्थानकात परवेझ शेखसोबत बसली असल्याची खबर आरोपी मुलाला लागली तेव्हा त्याने घटनास्थळी जात आईवर विटांनी हल्ला केला आणि त्यात तिचा मृत्यू झाला.

इतर बातम्या - ब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी

आरोपी मुलाने विटाने मारहाण केल्यामुळे परवेझच्या चेहर्‍यावर गंभीर दुखापत झाली असून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर यामध्ये आईचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा सगळा प्रकार घडल्यानंतर बस स्थानकातील इतर प्रवाशांनी याची माहिती पोलिसांना देत आरोपी मुलाला पोलिसांच्या ताब्यात केलं. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकाराचा कसून तपास करत आहेत.

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक प्रदीप भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एम.एच. साबू सिद्दिक कॉलेजचा विद्यार्थी असून तो इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा करत होता. आरोपीला भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 302 अन्वये अटक करण्यात आली आहे.

इतर बातम्या - जम्मू काश्मीर : घरात दडून बसलेले 3 अतिरेकी ठार; सुरक्षा दलांची कारवाई

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2019 10:27 PM IST

ताज्या बातम्या