मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मुंबईकरांनो सावधान! झोपडपट्टी परिसरात कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त - सर्व्हे

मुंबईकरांनो सावधान! झोपडपट्टी परिसरात कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त - सर्व्हे

मंगळवारी मुंबईतील रुग्णांची संख्या कमी झाली, त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला असला तरी, सीरो सर्व्हे (Sero Survey)रिपोर्टनं मात्र चिंता वाढवली आहे.

मंगळवारी मुंबईतील रुग्णांची संख्या कमी झाली, त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला असला तरी, सीरो सर्व्हे (Sero Survey)रिपोर्टनं मात्र चिंता वाढवली आहे.

मंगळवारी मुंबईतील रुग्णांची संख्या कमी झाली, त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला असला तरी, सीरो सर्व्हे (Sero Survey)रिपोर्टनं मात्र चिंता वाढवली आहे.

  • Published by:  Priyanka Gawde
मुंबई, 29 जुलै : देशातील कोरोनाबाधितांचा आकडा कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. यातच मंगळवारी मुंबईतील रुग्णांची संख्या कमी झाली, त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला असला तरी, सीरो सर्व्हे (Sero Survey)रिपोर्टनं मात्र चिंता वाढवली आहे. दिल्लीच्या सीरो सर्व्हेनंतर मुंबईचा सीरो रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टनुसार मुंबईत कोरोनाव्हायरसचं (Coronavirus) 57% संक्रमण हे झोपडपट्टी परिसरात तर, 16% बिगर झोपडपट्टी झाले आहे. मुंबई महापालिकेच्या वतीने आर/उत्तर, एम/पश्चिम आणि एफ/उत्तर या 3 विभागांमध्ये मिळून 6 हजार 936 लोकांचे सेरो सर्वेक्षण करण्यात आहे. यातून हा कळले की, झोपडपट्टी परिसरातील 57% लोकांमध्ये अँटिबॉडी आढळल्या. तर बिगर झोपडपट्टी परिसरात हे प्रमाण केवळ 16% आहे. देशात कोरोनाव्हायरसमुळे सगळ्यात जास्त मुंबई शहर प्रभावित आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ही इतर राज्यांपेक्षाही जास्त आहे. मुंबईत सध्या 1 लाख 10 हजार 882 झाली आहे. मुंबईत 19 हजार 990 सक्रीय रुग्ण आहेत. तर, 6187 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. वाचा-भारतातल्या COVID-19 रुग्णांची संख्या गेली 15 लाखांवर, जगात तिसरा क्रमांक हर्ड इम्युनिटीची शक्यता सीरो रिपोर्टनुसार मुंबईची सध्याची परिस्थिती पाहता या भागात हर्ड इम्युनिटीची (सामूहित प्रतिकारशक्ती) शक्यता व्यक्त केली जाते. पालिका आणि इतर संस्थांच्या एकत्रित सेरॉलॉजीकल सर्वेत हे सिद्ध झाले आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या दुसऱ्या सर्वेक्षणात हर्ड इम्युनिटीवर सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मुंबईमध्ये सार्स-कोविड 2 संसर्गाच्या अनुषंगाने, रक्त नमुने घेऊन करावयाचे सर्वेक्षण अर्थात सेरोलॉजिकल सर्वेलन्साचा उपक्रम सुरु केला होता. भारतातील एक व्यापक अवछेदी सर्वेक्षण (क्रॉस-सेक्शनल सर्वे) म्हणून या अभ्यासाचे उद्दिष्‍ट नागरिकांमध्‍ये असलेल्या रक्‍तातील प्रतिद्रव्‍य (ऍन्‍टीबॉडीज) चे प्राबल्य जाणून घेणे हे होते. त्यासाठी यादृच्छिक पद्धती (Random Sampling) ने नमुने संकलित करण्यात आले. वाचा-भारतात 'कोरोना'साथ गेली तिसऱ्या टप्प्यात? NCDCच्या सर्व्हेत धक्कादायक निष्कर्ष हर्ड इम्युनिटी - हर्ड इम्युनिटी म्हणजे समूहाची रोग प्रतिकारकशक्ती. हर्ड इम्युनिटीमुळे एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे जाणाऱ्या रोगाचा प्रसार मंदावतो. वाचा-जगात दुसऱ्यांदा होणार कोरोना व्हायरचा उद्रेक? तज्ज्ञांनी केला मोठा खुलासा महाराष्ट्रात आतापर्यंत 14 हजार 165 मृत्यू मंगळवारी एका दिवसाता महाराष्ट्रात 7 हजार 717 नवीन कोरोना रुग्ण सापडले. यासह महाराष्ट्र राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 3 लाख 91 हजार 440 झाली आहे. राज्यातील एकूण मृतांचा आकडा आता 14 हजार 165 झाला आहे. तर, 10 हजार 333 रुग्ण एका दिवसात निरोगीही झाले. यासह निरोगी रुग्णांची संख्या 2 लाख 32 हजार 277 झाली आहे.
First published:

Tags: Corona, Corona virus in india

पुढील बातम्या