'ओखी' वादळामुळे मुंबईत पाऊस ; मुंबईसह किनारपट्टी भागातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर

ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा कॉलेजना उद्यासाठी सुट्टी देण्यात आली आहे. ओखी वादळाचा धोका टळला असला तरी मुंबईत पावसाला सुरुवात झालीय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Dec 4, 2017 09:33 PM IST

'ओखी' वादळामुळे मुंबईत पाऊस ; मुंबईसह किनारपट्टी भागातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर

04 डिसेंबर, मुंबई : ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा कॉलेजना उद्यासाठी सुट्टी देण्यात आली आहे. ओखी वादळाचा धोका टळला असला तरी मुंबईत पावसाला सुरुवात झालीय. मुंबईतल्या दादर, परळ, कुलाबा भागात संध्याकाळी जोरदार पाऊस झाला. मुलुंड, भांडुपमध्येही पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळं ऑफिसमधून घरी निघालेल्या मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान, आता हे ओखी वादळ गुजरातकडे सरकल्याने मुंबईवरील वादळाचा धोका टळला असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं.

अंबरनाथ आणि बदलापूर शहरात संध्याकाळी अचानक पाऊस सुरू झाला. अंबरनाथमध्ये पावसाच्या सरी जोराने बरसत असल्यानं नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. सायंकाळी काहीसे ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानंतर अचानक पाऊस सुरू झाला. जेमतेम तासभर पडलेल्या या पावसामुळे रस्ते मात्र ओले झाल्यानं, रस्त्यावरील धुळीपासून नागरिकांना दिलासा मिळाला. बदलापूर शहरात रिमझिम पाऊस झाला. गेल्या आठवड्यातदेखील सलग दोन दिवस असाच रिमझिम पाऊस ठाणे जिल्ह्यातील अनेक भागात झाला होता.

दरम्यान, ओखी वादळाचा फकटा शालेय विद्यार्थ्यांना उद्या बसू नये, यासाठी खबरदारी म्हणून मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, रायगड पालघर या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय, राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिलीय.

 

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 4, 2017 09:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...