मुंबई: अनुयायांना घेऊन संतांनी केलं जंगी बर्थडे सेलिब्रेशन, पार्टीत होते 9 कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई: अनुयायांना घेऊन संतांनी केलं जंगी बर्थडे सेलिब्रेशन, पार्टीत होते 9 कोरोना पॉझिटिव्ह

उल्हासनगरमधील अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या कॅम्प 5 भागातील वसन शहा दरबारातील संताने 17 मे रोजी मोठ्या धुमधडाक्यात आपला वाढदिवस साजरा केला होता.

  • Share this:

मुंबई, 02 जून : संचारबंदी आणि लॉकडाऊन काळात गर्दी जमा करून वाढदिवस साजरा करणाऱ्या दोघांवर उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगरमधील अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या कॅम्प 5 भागातील वसन शहा दरबारातील संताने 17 मे रोजी मोठ्या धुमधडाक्यात आपला वाढदिवस साजरा केला होता.

वाढदिवसाला उपस्थित अनुयायीमधील 9 जणांना कोरोणाची लागण झाली होती. चिंतेची बाब म्हणजे या वाढदिवसाला मोठ्या संख्येनं संतांचे अनुयायी उपस्थित होते. त्यामुळे अनेकांना कोरोना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान उल्हासनगर पोलिसांनी या घटनेची दखल घेत संचारबंदी आणि लॉकडाऊन काळात 5 पेक्षा अधिक लोकांची गर्दी जमवून वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे पोलीस आयुक्यांच्या मनाई आदेश आणि साथी रोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याने परमानंद जग्याशी आणि कमलेश जग्याशी यांच्या दोघावर उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यानुसार पोलीस पुढील तपास करत आहेत. आधीच राज्यात कोरोनाचा फैलाव वेगाने वाढत आहे. त्यात अशा प्रकारे वाढदिवस साजरा करणं म्हणजे परिसरात धोका मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

एकीकडे, देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. एकूण कोरोना रूग्णांची संख्या दोन लाखांच्या जवळपास पोहोचली आहे. त्याचबरोबर, गेल्या 24 तासात पुन्हा एकदा 8 हजारांहून अधिक कोरोना रूग्ण समोर आले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत 198706 मध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत. त्याचबरोबर मृतांची संख्या 5598 वर पोहोचली आहे.

गेल्या 24 तासात 8171 नवीन कोरोना रुग्ण समोर आले आहेत तर 24 तासात 204 मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत बरे 91818 रुग्ण बरे झाले आहेत. 93322 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण आकडेवारीनुसार, रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 48.07 टक्के इतकी आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढून 70013 झाली आहे. यापैकी 37543 लोकांवर उपचार सुरू आहेत, तर 30108 लोक बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 2362 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत कोरोनाचे 20834 रुग्ण आहेत, त्यापैकी 8746 लोक बरे झाले आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत 11565 रुग्ण सक्रिय असून विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजधानी दिल्लीत संक्रमणामुळे मृतांचा आकडा 523 वर पोहोचला आहे.

First published: June 2, 2020, 12:10 PM IST

ताज्या बातम्या