चेंबूर बलात्कारप्रकरणी कुटुंबीयांना पोलीस संरक्षण, महिला आयोगाचा पोलिसांना आदेश

चेंबूर बलात्कारप्रकरणी कुटुंबीयांना पोलीस संरक्षण, महिला आयोगाचा पोलिसांना आदेश

या घटनेसंदर्भात आज 31 आगस्ट 2019 रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पीडित युवतीचे बंधू, त्यांचे अन्य नातेवाईक आणि सहकारी यांची भेट घेतली.

  • Share this:

प्रफुल्ल साळुंखे, प्रतिनिधी

मुंबई, 31 ऑगस्ट : जालना जिल्ह्यातील युवतीवर मुंबईतील चुनाभट्टी पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये घडलेल्या अत्याचारानंतर झालेल्या मृत्यू घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने यापूर्वीच स्वाधिकारे दखल घेतलेली आहे. तशी नोटीसही मुंबई पोलिसांना 29 रोजी बजावलेली आहे. या घटनेसंदर्भात आज 31 आगस्ट 2019 रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पीडित युवतीचे बंधू, त्यांचे अन्य नातेवाईक आणि सहकारी यांची भेट घेतली.

घरातल्या तरुण मुलीचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण पीडित कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. विजया रहाटकर यांनी त्यांचे सांत्वन केले आणि न्याय मिळवून देण्याचा दिलासा दिला. त्या दृष्टीकोनातून श्रीमती रहाटकर यांनी चुनाभट्टी पोलीस स्थानकाच्या कार्यालयात मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे, अतिरिक्त पोलिस आयुक्त लक्ष्मी गौतम, पोलीस उपायुक्त शशि मीना यांच्या उपस्थितीत बंधू, त्यांचे नातेवाईक आणि सहकारयांशी तपशीलवार चर्चा केली. या चर्चेमध्ये पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले आहेत

1. पीडितेच्या कुटुंबीयांची मागणी लक्षात घेऊन आणि पीडितेला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीकोनातून या घटनेचा तपास ‘सीबी-सीआयडी’कडे त्वरीत सोपविण्यात येईल. ‘सीबी-सीआयडी’कडून त्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमलं जाईल.

2. पीडितेचे बंधूला पोलिस संरक्षण दिले जाईल.

3. या घटनेचा प्रारंभिक तपास करताना मुंबईच्या पोलीस निरीक्षक श्रीमती शिर्के यांनी भावाला नीट वागणूक दिली नसल्याचा आरोप लक्षात घेऊन त्यांची चौकशी करावी आणि त्याआधारे योग्य ती कारवाई करावी.

इतर बातम्या - मंदिरात निघालेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, ओळखीच्याच लोकांनी केले अत्याचार!

4. औरंगाबादच्या घाटी रूग्णालयात तज्ज्ञ, निष्णात डाक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन (पोस्ट मार्टेम) करावं. हे शवविच्छेदन करताना सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचा काटेकोर अवलंब करावा. या शवविच्छेदनाला बंधू आणि त्यांच्या पालकांनी संमती दिलेली आहे.

5. औरंगाबादमधील घाटी रूग्णालयातील डाक्टरांनी पीडितेच्या कुटुंबीयांना नीट वागणूक दिली नाही, हा आरोप लक्षात घेऊन संबंधित डाक्टरांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी.

इतर बातम्या - मोदींचं नाव घेताच बसला शॉक, पाहा पाकिस्तानच्या 'आयटम' मंत्र्याचा व्हायरल VIDEO

6. या घटनेमध्ये 'मनोधैर्य' योजनेतंर्गंत पीडितेच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य त्वरीत दिलं जावं. त्यासाठी सर्व प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या निर्देश संबंधितांना दिलं आहेत.

7. महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, 1993 अंतर्गंत कलम 10 (1)(क) (एक) आणि(दोन) आणि कलम 10(2) अन्वये आयोगाने ही कार्यवाही केलेली आहे.

SPECIAL REPORT : पाकमध्ये शीख धर्मगुरूच्या मुलीचं अपहरण, मुस्लिम तरुणासोबत निकाह!

First published: August 31, 2019, 8:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading