मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये पूरसदृष्य परिस्थिती तर मुंबई पावसाचा जोर ओसरला, वाचा मान्सून अपडेट

मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये पूरसदृष्य परिस्थिती तर मुंबई पावसाचा जोर ओसरला, वाचा मान्सून अपडेट

खडकवासला धरण 95 टक्के भरल्यामुळे बुधवारी संध्याकाळी 500 क्यूसेक पाणी सोडण्यात आलं आहे. धरण क्षेत्रात पाऊस अजूनही सुरू असल्यामुळे शुक्रवारी पहाटे 1700 क्यूसेक पाणी सोडण्यात येणार आहे.

  • Share this:

मुंबई, 11 जुलै : मुंबईत पावसाचा जोर ओसरला तरी धरणक्षेत्रांत चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे  24 तासांत तलावात सुमारे 4 टक्क्यांनी जलसाठा वाढला आहे. 10 दिवसांत हा साठा 4 टक्क्यांवरून 29 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. खरंतर मुबंईत दमदार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. पण पावसाचा जोर ओसरला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात दमदार पाऊस...

खडकवासला धरण 95 टक्के भरल्यामुळे बुधवारी संध्याकाळी 500 क्यूसेक पाणी सोडण्यात आलं आहे. धरण क्षेत्रात पाऊस अजूनही सुरू असल्यामुळे शुक्रवारी पहाटे 1700 क्यूसेक पाणी सोडण्यात येणार आहे. तर धरण परिसरातील नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आदेश कार्यकारी अभियंता पी. बी. शेलार यांनी दिले आहेत.

पुण्यात एक नंबर पाऊस

पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. तर पुढच्या 2 दिवस पावसाच्या हलक्या सरी बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. चांगला पाऊस झाल्यामुळे सगळे नदी, तलाव आणि धरणं पाण्याने भरली आहेत. त्यामुळे पुणेकरांचा पाणी प्रश्न मिटला आहे. दरम्यान, राज्यात पुण्यासह मुंबई आणि पालघरमध्ये सरासरीपेक्षा जास्त टक्क्यांनी पाऊस पडला आहे.

दुसरीकडे मुंबई महापालिकेनं शहर आणि उपनगरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सोशल नेटवर्क साइट्सचा वापर सुरू केला आहे. हाच वापर आता जमेची बाजू ठरतोय. पालिकेच्या सर्व 24 विभागांसह 7 खात्यांच्या 'ट्विटर हँडल'वर मुंबईकरांकडून फोटोसह अनेक तक्रारी अपलोड करण्यात येत आहेत.  आलेल्या तक्रारींवर पालिका त्वरित कार्यवाही करत असून, नागरी समस्या लवकरात लवकर सोडवण्यावर भर दिला जातो आहे.

दरम्यान, यंदा उशिरा आलेल्या पावसाने मोठी जीवितहानी केली तर अनेक अपघातांमध्ये काही लोक जखमी झाले आहेत. ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात श्रीराम यादव हे वागळे इस्टे येथील टोयोटा समोरून रिक्षातून जात असताना अचानक आलेल्या वादळामुळे यादव यांच्या रिक्षावर झाड पडलं. यात यादव आणि एक वाटसरू जख्मी झालेत. दोघांवर ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

डोंबिवलीत रेल्वे स्टेशनजवळीच्या अंबिका हॉटेलचा पीओपी भाग काल दुपारी कोसळला. हा कायमचा रहदारीचा परिसर असतो. या दुर्घटनेच्या वेळी रस्त्यावरून जाणारे 2 ते 3 किरकोळ रित्या जखमी झाले आहेत. या हॉटेलची इमारत यापूर्वीच धोकादायक घोषित करण्यात आली होती.

नवी मुंबईतल्या पनवेल भागात गाढी नदीत वाहून गेलेल्या पती-पत्नींचा अजूनही शोध लागला नाही आहे. आज शोधकार्यादरम्यान आदित्य आंब्रे यांची दुचाकी सापडली आहे. मात्र, आदित्य आणि सारिका आंब्रे अजूनही बेपत्ता आहेत. सलग तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे गाढी नदीच्या पुलावरून पाणी वाहत होतं. याच पाण्यातून वाट काढताना काल आदित्य आणि सारिका आंब्रे नदीत वाहून गेलेत. अजूनही या दोघांना शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

तिकडे पावसामुळे खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. मुंबई महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे. पहाटे साडेसहापासून मार्ग सुरू झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीनं काल धोक्याची पातळी ओलांडली होती. नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं महामार्गावर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लाईनला बोर घाटाजवळ काही वेळापूर्वी दरड कोसळली आहे. या घटनेमध्ये हे तीन कामगार किरकोळ जखमी झाले आहेत. तर नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे. या पावसामुळं त्र्यंबकेश्वरमधील महादेवाच्या मंदिरात पाणी भरलं आहे. गोदावरीला पुन्हा पूर आला असून गावातही पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळं जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक वाहनं पाण्यात गेली आहेत.

VIDEO: बियाणं विकणाऱ्या कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक, यासोबत टॉप 18 बातम्या

First published: July 11, 2019, 9:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading