पुढच्या 24 तासांत हवामान खात्याकडून अलर्ट, या भागांत कोसळणार मुसळधार पाऊस

पुढच्या 24 तासांत हवामान खात्याकडून अलर्ट, या भागांत कोसळणार मुसळधार पाऊस

पावसाच्या हलक्या सरी पडल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेलं तापमान कमी झालं आणि हवेत गारवा निर्माण झाल्यानं मुंबईकर सुखावले आहेत.

  • Share this:

पुणे, 21 सप्टेंबर : पुढच्या 24 तासांमध्ये दक्षिण कोकण, गोवा भागात मुसळधार पावसाचा अंदाज तर मुंबईसह ठाणे काही भागात पावसाचा अंदाज आहे हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. उद्या मुंबई ठाणे सातारा कोल्हापूर रायगड, पुणे जिल्ह्यात काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळा वर्तविला आहे. मुंबई-ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार आहे.

दरम्यान, शनिवारी पावसाच्या हलक्या सरी पडल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेलं तापमान कमी झालं आणि हवेत गारवा निर्माण झाल्यानं मुंबईकर सुखावले आहेत. राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि तळ कोकणता पुढचे तीन दिवस अलर्ट जारी केला आहे.

'मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्या अन्यथा मनसे राज्यभर आंदोलन करणार'

मुंबई-ठाणे-पालघर परिसरात हलक्या स्वरुपाचा तर तळ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही परिसरात पुढचे तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुरात पुढचे तीन दिवस अति मुसळधार पाऊस असेल त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. तर तळकोकणात समुद्र किनाऱ्याजवळील परिसरातील नागरिकांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Gold Price: आठवड्याच्या पहिल्या दिवशी महागलं सोनं, पाहा काय आहेत आजचे भाव

दरम्यान, दक्षिण सिंधुदुर्गला आज सकाळपासून पावसाने झोडपून काढलं आहे. कुडाळ सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पाउस सुरु असून मुंबई गोवा महामार्गाचा झारापजवळचा भाग पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे महामार्गावरची वाहतूक मंदावली आहे. कुडाळ तालुक्यातल्या अनेक गावातले अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेले आहेत. कालपासून सुरू असलेल्या या पावसाने मोठ्या प्रमाणात भात शेतीतही पाणी भरलं आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 21, 2020, 12:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading