पावसामुळे मुंबईत भीषण अपघात; ट्रक, कारच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू 5 जखमी

पावसामुळे मुंबईत भीषण अपघात; ट्रक, कारच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू 5 जखमी

ट्रक आणि कारमध्ये हा भीषण अपघात झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. जोगेश्वरी ईस्टमध्ये ट्रोमा रुग्णालयासमोर असलेल्या फ्लायओव्हरवर हा अपघात झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 06 जुलै : मुंबईच्या जोगेश्वरी फ्लायओव्हरवर शनिवारी सकाळी एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर 5 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. ट्रक आणि कारमध्ये हा भीषण अपघात झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. जोगेश्वरी ईस्टमध्ये ट्रोमा रुग्णालयासमोर असलेल्या फ्लायओव्हरवर हा अपघात झाला आहे. घटनास्थळी दाखल पोलिसांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं आहे.

चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचा वेग जास्त होता त्यात मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. अशात गाडीवरचा ताबा सुटल्याने अपघात झाला. ट्रकचा वेग जास्त असल्याने त्याला वेळीच ब्रेक मारता आला नाही आणि त्यामुळे ट्रक कारवर जाऊन आदळला. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कारचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी

भर रस्त्यात अपघात झाल्यामुळे संपूर्ण रस्ता जाम झाला होता. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलीस घटनास्थळावरून अपघाती वाहणं बाजूला करण्याचं काम करत आहेत. तब्बल एक तास मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

रानडुकराचा दिव्यांग तरुणावर हल्ला; जीव वाचवतानाची धडपड कॅमेऱ्यात कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 6, 2019 11:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading