मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Alert : पुढचे काही तास धोक्याचे; पंतप्रधान मोदींनी केला उद्धव ठाकरेंना फोन

Alert : पुढचे काही तास धोक्याचे; पंतप्रधान मोदींनी केला उद्धव ठाकरेंना फोन

अजूनही धोका टळलेला नाही. मुंबई, ठाणे आणि परिसरातील नागरिकांनी घरातच राहावे. सुरक्षित राहावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.

अजूनही धोका टळलेला नाही. मुंबई, ठाणे आणि परिसरातील नागरिकांनी घरातच राहावे. सुरक्षित राहावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.

अजूनही धोका टळलेला नाही. मुंबई, ठाणे आणि परिसरातील नागरिकांनी घरातच राहावे. सुरक्षित राहावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी
मुंबई, 5 ऑगस्ट : मुंबईत गेले काही तास संततधार पाऊस सुरूच आहे. दुपारपासून वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसाने कहर केला. अजूनही पुढचे काही तास अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि परिसरातील नागरिकांनी घरातच राहावे. सुरक्षित राहावे, असं आवाहन पोलीस आयुक्त, प्रशासन आणि मंत्र्यांनी केलं आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मुंबईतल्या पावसाच्या परिस्थितीविषयी चर्चा केली. केंद्राकडून शक्य असेल ती सर्व मदत दिली जाईल, असं आश्वासनही पंतप्रधानांनी दिलं. मुंबईत पावासाचा कहर सुरू आहे. दिवसभरात मुंबईच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. 300 मिमीच्या वर पाऊस झाला आहे. या पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं होतं. दोन लोकल ट्रॅकवरच थांबल्याने त्यातले सर्व प्रवासी तिथेच अडकले. ट्रॅकवर पाणी चढत गेलं आणि प्रवाशांना वाचवण्यासाठी NDRF ला पाचारण करण्यात आलं. मुंबईसह उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र, बुधवारी सायंकाळी पावसाचा जोर आणखी वाढला आहे. वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील तीन तासांसाठी मुंबई आणि शहरासाठी हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. दुपारी दक्षिण मुंबईत पावसाचा जोर अधिक होता. आता उपनगरांतही जोर वाढला आहे. ठाण्यातही संध्याकाळापासून जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. त्यामुळे ठाण्याचे पोलीस उपायुक्त (वाहतूक) अमित काळे यांनी नागरिकांनी बाहेर पडू नये, असं आवाहन केलं आहे. जोरदार पावसाबरोबर तुफानी वाराही मुंबईत होता. मुंबईत आज किनारी भागात ताशी 100 किमी पेक्षा जास्त वेगाने वारे वाहिल्याची नोंद झाली आहे. अनेक इमारतींवर असलेली होर्डिंग्ज वाकली. अनेक झाडं रस्त्यावर पडली. मुंबईतील मुसळधार पावसामुळे घराबाहेर न पडण्याचं मुंबई पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी आवाहन केलं आहे. आपातकालीन परिस्थितीमध्ये मुंबई पेलिसांशी 100 या क्रमांकावर अथवा ट्विटरवर संपर्क साधवा, असही पोलिस आयुक्तांनी म्हटलं आहे.
First published:

Tags: Mumbai rain

पुढील बातम्या