Home /News /news /

फक्त काही सेंकद, भली मोठी दरड कोसळली मुंबईच्या महामार्गावर, थरारक LIVE VIDEO

फक्त काही सेंकद, भली मोठी दरड कोसळली मुंबईच्या महामार्गावर, थरारक LIVE VIDEO

डोंगरावर विजेचा टॉवर कधीही कोसळू शकतो म्हणून कोसळलेल्या दरडीचा भाग आज बाहेर काढला जाणार नाही. त्यामुळे आज दिवसभरात वाहतुकीसाठी महामार्गाचा पट्टा वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.

मुंबई, 04 : मुंबईत पावसाने धुमशान घातले आहे. ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर दरड कोसळली. या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. सोमवारी रात्रीपासून मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कांदिवली परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गावर आज सकाळी भलीमोठी दरड कोसळली. टाईम्स ऑफ इंडियाच्या ऑफिसजवळ ही दुर्घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, जेव्हा ही दरड कोसळली तेव्हा रस्त्यावर वाहतूक सुरू होती. वाहतूक सुरू असताना अचानक भलेमोठाले दगडं महामार्गावर येऊन आदळली. यात मारुती सुझुकीची कार सापडली. पण, नशीब बलवत्तर होते म्हणून कोणतीही इजा झाली नाही.  दरडीचा भाग महामार्गावर कोसळल्यामुळे एकाबाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. ज्या डोंगरावरून ही दरड कोसळली त्या डोंगरावर विजेचा टॉवर कधीही कोसळू शकतो म्हणून कोसळलेल्या दरडीचा भाग आज बाहेर काढला जाणार नाही. त्यामुळे आज दिवसभरात वाहतुकीसाठी महामार्गाचा पट्टा वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. डोंगराच्या पायथ्याशी कोसळलेला दरडीचा भाग जर काढला तर डोंगराचा आणखी काही भाग कोसळण्याची भीती आहे. खबरदारी म्हणून दरड हटवण्याचे काम थांबवण्यात आले आहे. जिओ टेक्निकल एक्सपोर्ट बोलणं झालेला आहे आणि त्यांनी दिलेल्या माहितीनंतरच महामार्गावरील वाहतूक खुली केली जाणार आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या