विजेच्या खांबाला हात लावू नका, नवी मुंबईत तरुणाने असा गमावला जीव!

विजेच्या खांबाला हात लावू नका, नवी मुंबईत तरुणाने असा गमावला जीव!

नवी मुंबईच्या सायन-पनवेल महामार्गावरील बत्तीच्या खांबाचा शॉक लागून एका तरुणाला आपला जीव गमावण्याची वेळ आली आहे.

  • Share this:

नवी मुंबई, 07 जुलै : सायन पनवेल महामार्गावरील बत्तीच्या खांबाला शॉक लागून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. उशिरा दाखल झालेल्या पावसाने गेल्या काही दिवसांत तुफान बटिंग केली. मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि आर्थिक नुकसान झालं. या सगळ्यात मृत्यूची आणखी एक घटना समोर आली आहे.

नवी मुंबईच्या सायन-पनवेल महामार्गावरील बत्तीच्या खांबाचा शॉक लागून एका तरुणाला आपला जीव गमावण्याची वेळ आली आहे. रात्री दीड वाजताची ही घटना आहे. यामध्ये 35 वर्षीय सुरेश जुनघरे याचा मृत्यू झाला आहे. फुटपाथवरून चालताना वीजेच्या खांबाला हात लागला. पावसाने सगळे खांब ओलो झाले असल्यामुळे सुरेशला शॉक लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

सगळ्यात धक्कादायक म्हणजे खांबावर केबल उघड्या असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. उघड्या केबलमुळे साचलेल्या पाण्यातून जाताना सुरेशचा मृत्यू झाला अशी माहिती संबंधित पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ऐन पावसाळ्यामुध्ये विजेच्या खांबाची तपासणी करणं महत्त्वाचं आहे. पण त्यात पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळे पिडब्लूडी आणि ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मृताच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे. तर अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यासही नातेवाईकांकडून विरोध करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात काय कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

कामावरून घरी येणाऱ्या सुरेशने अशा पद्धतीने आपला जीव गमावल्यामुळे त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यामुळे पावसाळ्यात अशा गोष्टींपासून लांब रहा. कोणत्याही विद्यूत खांबाला हात लावू नका अशा सूचना यानंतर देण्यात आल्या आहेत.

VIDEO: रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

First published: July 7, 2019, 11:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading