मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस वे'वरती टेम्पो ट्रॅव्हलर प्रवासी मिनीबस जळाली !

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरती एक टेम्पो ट्रॅव्हलर प्रवासी बस जळून खाक झालीय. स्वराज माझा या कंपनी ही मिनी बस मुंबईहून पुण्याकडे जात असतानाच गाडीने अचानक पेट घेतला. वाहन चालकाने प्रसंगावधान दाखवून तात्काळ सर्व प्रवाशांना खाली उतरवलं त्यामुळे मोठा अनर्थ टळला, या मिनीबसमध्ये 16 प्रवासी होते. ते सर्वजण सुखरूप आहेत

Chandrakant Funde | Updated On: Nov 19, 2017 10:01 PM IST

मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस वे'वरती टेम्पो ट्रॅव्हलर प्रवासी मिनीबस जळाली !

19 नोव्हेंबर, लोणावळा : मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरती एक टेम्पो ट्रॅव्हलर प्रवासी बस जळून खाक झालीय. स्वराज माझा या कंपनी ही मिनी बस मुंबईहून पुण्याकडे जात असतानाच गाडीने अचानक पेट घेतला. वाहन चालकाने प्रसंगावधान दाखवून तात्काळ सर्व प्रवाशांना खाली उतरवलं त्यामुळे मोठा अनर्थ टळला, या मिनीबसमध्ये 16 प्रवासी होते. ते सर्वजण सुखरूप आहेत.

चालकाने वेळीच ही बस रस्त्याच्या बाजुला घेतल्याने इतर वाहनांना या आगीची झळ पोहोचली नाही, तरीपण आग विझवण्यासाठी अर्धा तास लागला. डेल्टा फोर्स, देवदूत या महामार्गावरच्या आपत्कालीन यंत्रणांनी त्वरीत ही आग विझवली. मिनीबसची ही आग विझेपर्यंत रस्त्यावरची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली होती. आता तिथली वाहतूक सुरळीत सुरू आहे. दरम्यान, बसच्या आगीमागचं कारण अजून समजू शकलेलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 19, 2017 09:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close