मुंबई-पुणे एक्सप्रेसवर कारची ट्रकला जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू तर 2 गंभीर

मुंबई-पुणे एक्सप्रेसवर कारची ट्रकला जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू तर 2 गंभीर

मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या कारची पूढे जाणार्‍या ट्रकला मागून जोरदार धडक बसल्याने अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून देण्यात आली आहे.

  • Share this:

तळेगाव, 10 डिसेंबर : गेल्या काही दिवसांमध्ये अपघाताचे प्रमाण वाढले असताना आज पहाटेच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या कारची पूढे जाणार्‍या ट्रकला मागून जोरदार धडक बसल्याने अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून देण्यात आली आहे. या भीषण अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

पहाटे तीन वाजताच्या सुमारास ओझर्डै गावाजवळ हा अपघात झाला आहे. महेश कदम अशी मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली आहे तर संतोष भोसले आणि प्रवीण कोकाटे अपघातामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडताच स्थानिकांकडून तात्काळ जखमींना नजिकच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून एक मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे तर आता अपघाताचा पुढील तपास करत आहे. गेल्या काही दिवसांत अपघाचं प्रमाण वाढलं आहे. 8 डिसेंबरला पुण्याहून मुंबईकडे जाणारा आयशर टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने शेजारून मुंबईकडे जाणाऱ्या कारवर पलटला होता. टेम्पोचा मागील भाग पूर्णपणे कारवर आदळल्याने कार टेम्पोखाली दाबली गेली होती. परंतु, या कारमधील दोघेजण अपघातातून किरकोळ जखमी होत सुखरूप बचावले होते. हा अपघात अमृतांजन ब्रिज बोर घाटातील तीव्र उतारावर दस्तूरी येथे झाला होता.

अपघातात टेम्पो तसेच चार चाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातग्रस्त दोन्ही वाहन महामार्गावरून बाजूला करण्यासाठी महामार्गावरची मुंबईकडे जाणारी वाहतूक काही वेळ थांबवण्यात आली होती. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी वाहतूक कोंडी झाली. महामार्ग पोलिसांकडून अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जातात परंतु नियमांची पायमल्ली करत भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांकडून नियमांचे उल्लंघन होतं. त्यामुळे अपघातांच्या संख्येतही वाढ झाली आहे.

भीषण अपघातात जीव गमावल्याच्या अनेक धक्कादायक घटना वारंवार समोर येत आहे. अपघाती वळणावरून गाडीचा वेग कमी ठेवावा अशा वारंवार सुचना दिल्यानंतरही गाडीच्या वेग कमी होत नाही त्यामुळे राज्यात अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. दरम्यान, मुंबईच्या चुनाभट्टीत कारच्या धडकेत एका तरुणीला आपला जीव गमावावा लागला. शुक्रवारी रात्री सव्वानऊ वाजता एका भरधाव चार चाकीने वीस वर्षीय अर्चना पार्टी या तरुणीला उडवलं. चार चाकीमधले चारही तरुण मद्यधुंद अवस्थेत होते. गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने चालकाने रस्त्यातून चालणाऱ्या तीन तरुणींच्या अंगावर गाडी घातली. त्यापैकी एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2019 09:15 AM IST

ताज्या बातम्या