अरेरे! मुंबईत चोरीला गेला 21 हजारांचा कांदा, CCTV VIDEO आला समोर

अरेरे! मुंबईत चोरीला गेला 21 हजारांचा कांदा, CCTV VIDEO आला समोर

सर्वसामन्यांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याची आता चोरी होत आहे.

  • Share this:

मुंबई, 11 डिसेंबर : सध्या कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. 150 रुपये कांदा सर्वसमान्य लोकांना परवडणारा नाहीये. त्यामुळे यावर काही अतिशहाण्या लोकांनी भलतीच युक्ती वापरली आहे. मुंबईत काही लोकांनी चक्क कांद्याची चोरी केली आहे. चोरट्यांनी सुमारे 21 हजार रुपयांच्या कांदा लंपास केला. मुंबईतील डोंगरी मार्केटमध्ये हे प्रकरण उघडकीस आले. चोरट्यांनी दोन दुकानातून 21 हजार 160 रुपये किंमतीचा कांदा चोरील गलेरून नेले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक माणूस एका दुकानात जाताना दिसला, जिथे कांद्याच्या मोठ्या पोत्या ठेवल्या आहेत. तो माणूस एक पोती उचलतो आणि पळून जातो.

वाचा-एका इन्स्टा पोस्टसाठी इतके कोटी घेते प्रियांका, जाणून घ्या इतर स्टार्सची कमाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मुंबई पोलिसांनी आयपीसीच्या डोंगरी पोलीस ठाण्यात कलम 379 अन्वये चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. एकूण 168 किलो कांदा चोरीला गेला आहे. ज्याची किंमत 21, 160 रुपये आहे. या बातमीची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.

वाचा-जंगलात दिसला कोट्यावधींचा दुतोंडी साप; गावकऱ्यांनी केला पाहुणचार, PHOTO VIRAL

वाचा-पाचव्या मजल्यावरून स्कूटीवर पडली 8 महिन्याची चिमुरडी, असा वाचला जीव!

दिल्लीमध्ये कांदा 96 रुपये प्रतिकिलो, मुंबईत 100 रुपये प्रति किलो, चेन्नईत 100 रुपये आणि कोलकातामध्ये 140 रुपये किलो विकला जात आहे. वाढत्या किंमतींचा विचार करता कांद्याची चोरी होऊ लागली आहे. गेल्या महिन्यात, महाराष्ट्रातील नाशिकमधील एका व्यावसायिकाने मध्य प्रदेश पोलिसांकडे तक्रार केली की, त्याच्या 22 लाख रुपयांपर्यंतच्या कांद्याची चोरी झाली आहे.

वाचा-लग्नानंतर अवघ्या वर्षभरात ही प्रसिद्ध अभिनेत्री घेतेय घटस्फोट, सांगितलं कारण

खरंतर कांदा महाग झाल्यामुळे त्याच्यावर सोशल मीडियावर भलत्याच चर्चा आहेत. TIKTOK सारख्या व्हिडिओ बनवणाऱ्या अॅपवर तर कांद्याने धिंगाना घातला आहे. कांद्याच्या वाढत्या किमतीवर अनेक जोक्सही व्हायरल झाले आहेत. सगळ्यांच्या स्टेटसवर, स्टोरीजवर कांद्याचे जोक्स पाहायला मिळतात. एकीकडे कांदे महागाईची अशी गम्मत होत आहे तर दुसरीकडे मात्र महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे आता कांद्याची चोरीसुद्धा होऊ लागली आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: December 11, 2019, 4:45 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading