फिजिओ थेरपीसाठी जात असाल तर सावधान, अश्लील VIDEO काढून...!

फिजिओ थेरपीसाठी जात असाल तर सावधान, अश्लील VIDEO काढून...!

फिजिओ थेरपीच्या नावावर अश्लील व्हिडिओ काढून लाखोंची खंडणी मागणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आला.

  • Share this:

मुंबई, 24 फेब्रुवारी : तुम्ही फिजिओ थेरपी घेण्यासाठी जात असाल तर ही बातमी तुमचं दुखणं कमी करण्यासाठी नाही तर तुमची डोकेदुखी वाढवण्यासाठी आहे. फिजिओ थेरपीच्या नावावर अश्लील व्हिडिओ काढून त्यानंतर लाखोंचा गंडा घालण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

फिजिओ थेरपीच्या नावावर अश्लील व्हिडिओ काढून लाखोंची खंडणी मागणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. मुंबई पोलिसांनी या रॅकेटमधल्या 5 जणांना ताब्यात घेतलं. ज्यात एका महिलेचा समावेश आहे. ही टोळी फिजिओ थेरपीच्या बहाण्यानं रुग्णांचे अश्लील व्हिडिओ काढून नंतर ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी द्यायची आणि लाखो रुपयांची खंडणी मागायची.

यासंदर्भात पोलिसांना माहिती मिळताच मोठा सापळा रचून पोलिसांनी मुंबईतल्या या टोळीला ताब्यात घेतलं आहे. या टोळीमध्ये एका महिलेचादेखील समावेश आहे.

धक्कादायक म्हणजे बॉलिवूडमधल्या एका नामांकित चित्रपट निर्मात्याकडेही या टोळीनं तब्बल 25 कोटींची मागणी केली होती. या निर्मात्याच्या वडिलांवर ही टोळी फिजिओ थेरपीचे उपचार करत होती. तेव्हा त्यांच्या वडिलांचा अश्लील व्हिडिओ त्यांनी शूट केला होता.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी या टोळीला ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तर यात आणखी कोणाचा हात आहे का याचाही पोलीस आता शोध घेत आहे.

असे सगळे प्रकार तुमच्यासोबतही होऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी गेल्यानंतर आधी परिसराची पाहणी करणं महत्त्वाचं आहे. कारण अखेर आपली सुरक्षा ही सगळ्यात महत्त्वाची आहे. एखाद्या पार्लरमध्ये किंवा थेरपी सेंटर, कोणत्याही बाथरूममध्ये जाण्याआधी त्या परिसराची पाहणी नक्की करा.

LIVE VIDEO : लग्न सोहळ्यात बंदुकीने पैसे उडवण्याचा प्रयत्न, गोळी लागून डान्सरचा मृत्यू

 

First published: February 24, 2019, 8:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading