मुंबईकरांसाठी पोलिसांकडून महत्त्वाची सूचना, आताच सावध व्हा नाहीतर होईल अटक

मुंबईकरांसाठी पोलिसांकडून महत्त्वाची सूचना, आताच सावध व्हा नाहीतर होईल अटक

सोशल मिडायावर पोलिसांची करडी नजर असणार आहे. हिसांचाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून दंगल घडविण्याच्या प्रकारांवर पोलिसांची विशेष नजर असणार आहे.

  • Share this:

मुंबई, 03 मार्च : दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर मुंबईत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी सोमवारी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. मुंबईत 9 मार्चपर्यंत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. यादरम्यान एका जागेवर 4 ते 5 पेक्षा अधिक लोक एकत्र येऊ शकत नाहीत. तर 9 मार्चपर्यंत रॅली, आंदोलन, आतिशबाजी यांवर बंदी घालण्यात आली आहे. या सगळ्यात आता सोशल मीडियावरून मुंबई पोलीसांनी हायअलर्ट दिलं आहे.

सोशल मिडायावर पोलिसांची करडी नजर असणार आहे. हिसांचाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून दंगल घडविण्याच्या प्रकारांवर पोलिसांची विशेष नजर असणार आहे. आक्षेपार्ह्य मजकूर पोस्ट केल्यास अटक होईल आणि कठोर कारवाई करण्यात येईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. दिल्लीतील हिंसाचारात आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

दिल्लीतील शाहीन बाग परिसरात जमावबंदी

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि एनआरसीच्या निषेधार्थ देशाची राजधानी दिल्लीच्या शाहीन बाग भागात दोन महिन्यांहून अधिक काळापासून लोक आंदोलन करत आहेत. दरम्यान, हिंदू सेनेनं शाहीन बागेत प्रतिआंदोलनाची घोषणा केली होती. ही घोषणा 29 फेब्रुवारी रोजी मागे घेण्यात आली. असं असूनही, लोक एकाच ठिकाणी पुन्हा एकत्र येऊ नयेत म्हणून दिल्ली पोलिसांनी खबरदारीसाठी  कलम 144 लागू केला आहे.

शाहीन बागच्या निदर्शकांनी ईशान्य दिल्लीतील हिंसाचाराविरोधात 1 मार्च रोजी शांतता मोर्चाची घोषणा केली होती. खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आला आहेत. शांतता कायदा व सुव्यवस्था राखणं हे पोलिसांचं उद्दीष्ट आहे. कोणत्याही अनपेक्षित घटनेसाठी पोलिसांनी ही तयारी केली आहे, असे दिल्ली पोलीस सहआयुक्त डी.सी. श्रीवास्तव म्हणाले.

संबंधित - दिल्ली हिंसाचारानंतर मोठी शोधमोहिम, कुठे आहे पोलिसांवर बंदूक रोखणारा शाहरुख?

कुठे आहे पोलिसांवर बंदूक रोखणारा शाहरुख?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील मौजपूर भागात गोळीबार करणारा आरोपी तरुण शाहरुख गोळीबारानंतर पानिपत पोहोचला. त्यानंतर तो कैराना, अमरोहासारख्या पश्चिम उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या शहरात लपला होता. शाहरुखच्या कॉल डिटेलवरून शोध घेणाऱ्या विशेष सेलला माहिती मिळाली आहे की, आरोपी आता उत्तर प्रदेशमधील बरेली इथे लपला आहे. पोलिसांनी यावर तपास केला असता आरोपी युवकाला लवकरच अटक केली जाईल.

संबंधित - दिल्लीच्या नाल्यांमधून अजूनही वाहत आहेत मृतदेह, आतापर्यंत 8 शव सापडले

दिल्लीच्या नाल्यांमधून अजूनही वाहत आहेत मृतदेह, आतापर्यंत 8 शव सापडले

शान्य दिल्लीत उफाळलेला हिंसाचार आता थंड झाला असला तरी मृतदेह सापडण्याचं प्रकरण काही थांबत नाही आहे. सोमवारीही भागीरथी विहार नाल्यातून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांकडून नाल्यातून आयबी कॉन्स्टेबल अंकित शर्मा यांच्यासह आतापर्यंत आठ मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.

हिंसाचाराच्या वेळी 26 फेब्रुवारी रोजी पोलीस हवालदार अंकितचा मृतदेह चांदबाग पुलियाजवळील नाल्यातून प्रथम सापडला. दुसर्‍या दिवशी 27 फेब्रुवारीला पोलिसांनी गोकलपुरी व गगन विहार नाल्यांमधून दोन मृतदेह ताब्यात घेतले. त्यानंतर 1 मार्च रोजी गोकुळपुरी, शिव विहार आणि भागीरथी विहार नाल्यांमधून चार मृतदेह सापडले तर सोमवारी पोलिसांनी भागीरथी विहार नाल्यातून एक मृतदेह ताब्यात घेतला.

हे वाचा - सुनेचा छळ केल्याप्रकरणी NCPच्या आमदार विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल

First published: March 3, 2020, 9:51 AM IST

ताज्या बातम्या