मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मुंबईत पोलीस निरीक्षकाचा हॉटेलमध्ये धुडगूस, कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीचा Live Video

मुंबईत पोलीस निरीक्षकाचा हॉटेलमध्ये धुडगूस, कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीचा Live Video

मुंबईतील एका पोलीस (Mumbai police) अधिकाऱ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबईतील एका पोलीस (Mumbai police) अधिकाऱ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबईतील एका पोलीस (Mumbai police) अधिकाऱ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Published by:  Pooja Vichare
मुंबई, 24 डिसेंबर: मुंबईतील एका पोलीस (Mumbai police) अधिकाऱ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसातील एका पोलीस अधिकाऱ्याचा हॉटेल चालकाकडून मोफत बिर्याणी मागवण्याचा ऑडिओ व्हायरल झाला होता. आता मुंबईतील पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडिओही (Mumbai police officer) असाच काहीसा आहे. मोफत जेवण दिलं नाही म्हणून एका हॉटेल कर्मचाऱ्याला पोलीस अधिकाऱ्यानं मारहाण केली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फ्री प्रेस जनरलनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. या मारहाण प्रकरणी सांताक्रूझमधील वाकोला पोलीस (Vakola Police) ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या विरोधात विभागीय चौकशीचे आदेश दिलेत. नेमकी घटना काय हॉटेल कर्मचाऱ्यानं मध्यरात्रीनंतर मोफत जेवण आणि दारु देण्यास पोलिसाला नकार दिला. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यानं वाकोला हॉटेलमध्ये कॅशिअरला मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गुरुवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास वाकोला पोलीस ठाण्याजवळील स्वागत रेस्टॉरंटमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला आहे. हेही वाचा-  विराट कोहली - BCCI वादात शास्त्रींची एन्ट्री, गांगुलीला दिला महत्त्वाचा सल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या व्हिडिओनुसार दिसत आहे की, हॉटेलमध्ये पोलीस अधिकारी हॉटेलच्या कॅशिअरकडे जातो. त्याचा शर्ट ओढत आहे तसंच त्याला मारहाण करत आहे. पोलीस निरीक्षकाविरोधात तक्रार या पोलीस निरीक्षकाचं नाव विक्रम पाटील असल्याचं समजतंय. या प्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात विक्रम पाटील यांच्याविरोधात आयपीसी कलम 323 नुसार तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती असोसिएशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंटचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी दिली आहे. याबाबतचं वृत्त फ्री प्रेस जनरलने दिलं आहे.
First published:

Tags: Mumbai police

पुढील बातम्या