मुंबई पोलिसांची सगळ्यात मोठी कारवाई, 12 बांग्लादेशी घुसखोऱ्यांना घेतलं ताब्यात

पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर छापा टाकून पोलिसांनी 12 बांग्लादेशी नागरिकांना ताब्यात घेतलं आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर छापा टाकून पोलिसांनी 12 बांग्लादेशी नागरिकांना ताब्यात घेतलं आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • Share this:
    मुंबई, 21 जानेवारी : मुंबईमध्ये पोलिसांच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील महानगरामध्ये अवैधरित्या घुसलेल्या बांग्लादेशीयांवर कारवाई केली आहे. या बांग्लादेशीयांनी अवैधरित्या भारतात प्रवेश केला. याबद्दल पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर छापा टाकून पोलिसांनी 12 बांग्लादेशी नागरिकांना ताब्यात घेतलं आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही बांग्लादेशी नागरिक कायद्याचं उल्लंघन करून भारतात घुसले आणि ते मुंबईमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. यानंतर संपूर्ण मुंबई आणि उपनगरांमध्ये याचा शोध सुरू होता. अंधेरीमध्ये काही बांग्लादेशी राहत असल्याची खबर पोलिसांच्या हाती लागली. त्यानंचर मोठा सापळा रचत या ठिकाणी पोलिसांच्या एका पथकाने छापा टाकला. हे बांग्लादेशी भारतात अवैधरित्या का शिरले याचा आता पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, आपल्याच परिसरात अशा प्रकारे घुसखोरी करून बांग्लादेशी नागरिक असल्यामुळे स्थानिक मुंबईकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलिसांनी या कारवाईमध्ये तब्बल 12 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. बांग्लादेशी घुसखोरांना हाकला नाही तर खळखट्याक, मनसेने दिला होता इशारा देशभरात NRC आणि CAAविरोधात तीव्र निदर्शनं सुरू आहे. सरकार या कायद्याची अंमलबजावणी नेमकी कशी आणि कधीपासून करणार हे खरंतर अजून निश्चितही झालेलं नाही. पण त्याआधीच पुण्यात मनसेनं शहरातील बांग्लादेशी घुसखोर मुस्लिमांना पकडून परत पाठवण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. मनसेचे पुणे शहर प्रमुख अजय शिंदे यांनी तसं पत्रच जिल्हाधिकाऱ्यांना दिलं होतं. त्यामुळे मनसेच्या या कृतीतून एकप्रकारे NRCला समर्थनच मिळाल्याचं बघायला मिळतं. इतर बातम्या - दिल्ली निवडणुकीत केजरीवालांना टक्कर देणार भाजपचा 'हा' वकील याच मुद्यावरून राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली होती. मनसेने पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांना पत्र लिहून शहरात असलेल्या घुसखोरांना हाकला नाहीतर मनसे आपल्या पद्धतीने आंदोलन करेल असा इशारा दिला. काय म्हणाले होते राज ठाकरे? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशभरात सुरू असलेल्या गोंधळावर काही दिवसांपूर्वीच आपली भूमिका जाहीर केली होती. 'देशातील आर्थिक मंदीवरून लक्ष हटवण्यात अमित शहा यशस्वी झाले आहेत. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. देशाची लोकसंख्या आधीच 125 कोटी असताना अजून बाहेरच्या लोकांना नागरिकत्व का द्यायचं?' असा प्रश्न राज ठाकरे यांनी सरकारला विचारला होता. इतर बातम्या - 'फक्त मुस्लिमांच्या आग्रहामुळे काॅंग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत' 'आधार कार्ड वापरून मतदान करू शकतो. मग आधार कार्डवर नागरिकत्व का सिद्ध होऊ शकत नाही. पण जे मोर्चे काढत आहेत, तोडफोड सुरू आहे, त्यांना तरी या कायद्याबद्दल नीट माहिती आहे का? जे वर्षानुवर्ष देशात राहात आहेत त्यांना का असुरक्षित वाटावं? भारत हा धर्मशाळा नाही. जे घुसखोर त्यांना हाकललंच पाहिजे,' अशी आक्रमक भूमिकाही राज ठाकरे यांनी घेतली होती. 'नोटबंदीनंतर देशात जे गोंधळाचं वातावरण तयार झालं तसंच आताही होत आहे. कारण या कायद्यातच गोंधळ आहे. राज्यातील मराठी मुसलमान शांत आहेत. त्यांची रोजी रोटी इथेच आहे. सरकार घुसखोर आणि शरणार्थी कसे ओळखणार?' असा सवाल करत राज ठाकरे यांनी या कायद्यातील तरतुदींवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. इतर बातम्या - राज ठाकरे इज बॅक! शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी मनसेचा मेकओव्हर
    First published: