मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मुंबईत पोलीसच झाला दरोडेखोर, 7 कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणी अटक

मुंबईत पोलीसच झाला दरोडेखोर, 7 कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणी अटक

चोरी झालेल्या 7 कोटी रुपयांपैकी 80 लाख रुपये हे अटक झालेल्या कॉन्स्टेबलच्या मित्राच्या घरून जप्त करण्यात आले.

चोरी झालेल्या 7 कोटी रुपयांपैकी 80 लाख रुपये हे अटक झालेल्या कॉन्स्टेबलच्या मित्राच्या घरून जप्त करण्यात आले.

चोरी झालेल्या 7 कोटी रुपयांपैकी 80 लाख रुपये हे अटक झालेल्या कॉन्स्टेबलच्या मित्राच्या घरून जप्त करण्यात आले.

मुंबई, 03 मे : लॉकडाऊनचा फायदा घेवून मुंबईतील अंधेरी इथे दरोडा टाकला गेला होता, या प्रकरणी आता एका पोलिसालाच अटक करण्यात आली आहे. चोरी झालेल्या 7 कोटी रुपयांपैकी 80 लाख रुपये हे अटक झालेल्या कॉन्स्टेबलच्या मित्राच्या घरून जप्त करण्यात आले. संतोष बाबुराव राठोड असं या पोलीसाचं नाव असून ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही चोरी झाली आहे त्या एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये संतोष राठोड हा पोलीस कर्मचारी एक वर्षा पुर्वी कामाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, राठोड यांची बदली ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये झाली. मात्र एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये असताना या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक दागिने तयार करण्याचे कारखाने आहेत. यापैकी नीरज इंडस्ट्रीज या गोल्ड मेकिंग कंपनीत कारखान्यात कोट्यावधी रुपयांचे दागिने आणि पैसे असल्याची माहिती संतोष राठोड याला मिळाली होती. Alert! देशात नव्या पद्धतीने होतोय सायबर घोटाळा, वाचण्यासाठी हे लक्षात ठेवा त्यानुसार या कारखान्यामध्ये दरोडा टाकण्याची योजना बनवण्यात आली आणि 6 एप्रिलच्या रात्री कारखानाच्या वरील सिमेंटचे पत्रे काढून ग्राऊंडरच्या सहाय्याने लॉकर तोडून त्यातून 7 कोटी 9 लाख रुपये किमतींचे दागिने आणि रोकड चोरली होती. मात्र या चोरीची माहिती नीरज इंडस्ट्रीज या गोल्ड मेकिंग कंपनीच्या मालकाला 22 एप्रिलला समजली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केली गेली आणि तपास सुरू झाला. सदर घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तसेच आजूबाजूचे सीसीटीवी फुटेज पोलिसांनी तपासाले असता. चौकशीच्या सुरुवातीलाच पोलिसांना एका गाडीचा नंबर ट्रेस झाला. त्या गाडीने बऱ्याच वेळा नीरज इंडस्ट्रीज या गोल्ड मेकिंग कंपनीच्या बाहेर चकरा मारल्याचं दिसून आलं. ती पोलिसांनी शोधून काढून एका ड्रायव्हरला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने ही चोरी कोणी कोणी व कशी केली याबाबत माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलं. पाच मुलींना द्यावी लागेल 'कोरोनाची अग्निपरीक्षा', वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण यामध्ये संतोष राठोड हा पोलीस कॉन्स्टेबल देखील होता. संतोष मात्र पोलिसांना चोरी बाबत सहकार्य करत नव्हता. गेली 3 दिवस संतोषची पोलीस कसून चौकशी करत होते. मात्र, तरीही संतोषनं पोलिसांना काहीच माहिती दिली नाही. शेवटी पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने तपास केला असता संतोष हा आपल्या एका मित्राच्या संपर्कात होता ही माहिती समोर आली. त्या मित्राच्या घरी धाड टाकली असता पोलिसाने चोरी केलेल्या 7 कोटी 90 लाख रुपयांपैकी 80 लाख रुपये शोधून काढले. चोरी झालेल्या 7 कोटी 90 लाख रुपयांपैकी पोलिसांनी आतापर्यंत 6 कोटी 17 लाख रुपये हस्तगत केले आहेत.
First published:

पुढील बातम्या