S M L

VIDEO : 'ते' दोघे आणि विमान कोसळतानाचा 'तो' थरारक क्षण

ज्यावेळी हे विमान या ठिकाणी कोसळलं त्यावेळी तिथून दोन कामगार जात होते.

Sachin Salve | Updated On: Jun 29, 2018 06:25 PM IST

VIDEO : 'ते' दोघे आणि विमान कोसळतानाचा 'तो' थरारक क्षण

मुंबई, 29 जून : घाटकोपरमध्ये झालेल्या चार्टर्ड विमान अपघाताचं सीसीटीव्ही दृश्ये समोर आलंय. काही सेकंदांचा हा व्हिडिओ हृदयाचा थरकाप उडवणारा आहे.

VIDEO : विमान कोसळण्याचा थरार सीसीटीव्हीत कैद

घाटकोपरमधील माणिकलाल परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आवारात चार्टर्ड विमान कोसळल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली होती. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून हे विमान यूवाय एव्हिएशन या कंपनीचं होतं. ज्यावेळी हे विमान या ठिकाणी कोसळलं त्यावेळी तिथून दोन कामगार जात होते.आणि काही कळायच्या आतच सुसाट वेगाने क्रॅश झालेलं विमान कोसळलं आणि पेट घेतला. मिळालेल्या माहितीनुसार,  21 वर्षांचा लवकुश कुमार आणि 24 वर्षांचा नरेश कुमार निशाद हे दोन तरुण होते. या दुर्घटनेत दोघेही जखमी झाले त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

कसा झाला चार्टर्ड विमानाचा अपघात?

घटनाक्रम

Loading...
Loading...

-  दुपारी एकच्या सुमारास जुहूवरुन उड्डाण

- सर्वोदय रुग्णालयाजवळ दुपारी 1.30वाजता विमान कोसळलं

- विमान दुर्घटनेत पायलटसह 5 जणाचा मृत्यू

- विमान दुर्घटनेत एका पादचाऱ्याचाही मृत्यू

- विमान कोसळल्यानंतर परिसरात आगीचे लोट

- इमारतीच्या टेरेसवर कोसळलं विमान

- यूपी सरकारने हे विमान UY एव्हिएशनला विकलं होतं

- अलाबादलाही याच विमानाला अपघात झाला होता

- अपघातग्रस्त विमानाचं नाव 'KING AIR C90'

- टेस्ट फ्लाईटदरम्यान यूपीचं विमान घाटकोपरमध्ये कोसळलं

- अपघाग्रस्त विमानाची क्षमता 12 प्रवासी होती

या अपघातात मृत्यू झालेल्या विमानात असलेल्या कर्मचाऱ्यांची नावं

 - या चार्टड विमानाची पायलट मारिया कुबेर

 - सह पायलट - पी. एस. राजपूत

 - तंत्रज्ञ - सुरभी

- तंत्रज्ञ - मनिष पांडे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 29, 2018 06:25 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close