'ओखी' वादळामुळे येत्या 48 तासात मुंबईत जोरदार पावसाची शक्यता

'ओखी' वादळामुळे येत्या 48 तासात मुंबईत जोरदार पावसाची शक्यता

ओखी वादळाच्या तडाख्यामुळे काल रात्रीपासून मुंबई आणि परिसरात जोरदार पाऊस पडतोय. अरबी समुद्रात ओखी वादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रात कालपासून पाऊस पडतोय. आजही सकाळपासून मुंबई, ठाण्यात पावसाची संततधार सुरू आहे. पुढच्या 48 तासांत मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलीय.

  • Share this:

05 डिसेंबर, मुंबई : ओखी वादळाच्या तडाख्यामुळे काल रात्रीपासून मुंबई आणि परिसरात जोरदार पाऊस पडतोय. अरबी समुद्रात ओखी वादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रात कालपासून पाऊस पडतोय. आजही सकाळपासून मुंबई, ठाण्यात पावसाची संततधार सुरू आहे. दुपारी भरतीच्या वेळी तर बांद्रयाचा सि लिंक पूर्णपणे ढगांच्या धुक्यात हरवून गेल्याचं बघायला मिळालं. पण लाटांची उंची साडेचार मीटरच्या आसपासच होती. त्यामुळे संभाव्य धोका टळला.

दरम्यान, आज सकाळी मात्र, पावसाच्या धुक्यामुळे विमानसेवा काही प्रमाणात प्रभावित झाली होती. पुढच्या 48 तासांत मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलीय. आज संध्याकाळपर्यंत हे ओखी वादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. त्यामुळे काही तास तरी मुंबई आणि किनारपट्टी भागाला वादळाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. त्यामुळे चैत्यभूमीवर दर्शनासाठी आलेल्या भीमसैनिकांनी शक्यतो समुद्र चौपाटीकडे जाणं टाळावं, असं आवाहन पालिकेनं केलंय.

दरम्यान, कोकण किनारपट्टी भागात ओखी वादळामुळे समुद्र खवळल्याने गणपतीपुळे भागात समुद्रालगतचा रस्ता मोठ्या प्रमाणावर खचून गेलाय. संपूर्ण किनारपट्टी भागात सोसाट्याचा वारा वाहतोय. समुद्राच्या मोठमोठ्या लाटा किनाऱ्यावर येऊन थडकताहेत. त्यामुळे पुढचे दोन दिवस तरी मच्छिमारांनी समुद्रात उतरू नये, असं आवाहन हवामान खात्याने दिलाय.

First published: December 5, 2017, 3:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading