पहिल्याच दिवशी Night Life कडे मुंबईकरांची पाठ, महत्त्वाची ठिकाणंच सामसूम

पहिल्याच दिवशी Night Life कडे मुंबईकरांची पाठ, महत्त्वाची ठिकाणंच सामसूम

ज्या चार ठिकाणी प्रायोगीक तत्वावर हा उपक्रम सुरू करण्यात आला त्याच ठिकाणी काल रात्रभर नेहमीची वर्दळ सोडता शुकशूकाटच पहायला मिळाला.

  • Share this:

मुंबई, 28 जानेवारी : मोठा गाजा-वाजा करून सुरू करण्यात आलेली 'मुंबई 24 तास' योजना अखेर सोमवार रात्रीपासून सरू झाली. मात्र, पहिल्याच रात्री मुंबईकरांचा अपेक्षित प्रतिसाद काही मिळाला नाही. ज्या चार ठिकाणी प्रायोगीक तत्वावर हा उपक्रम सुरू करण्यात आला त्याच ठिकाणी काल रात्रभर नेहमीची वर्दळ सोडता शुकशूकाटच पहायला मिळाला. त्यामुळे 'मुंबई 24 तास' पहिल्याच दिवशी अपयशी ठरली असं म्हणायला हरकत नाही.

'मुंबई 24 तास' संकल्पनेचं मुंबईकरांनी स्वागत केलं असलं तरी त्यांची अपैक्षा काही पहिल्या रात्री पुर्ण होऊ शकली नाही. मात्र, येत्या काही दिवसांत या योजनेला नक्की चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही मुंबईतील मरीन ड्राईव्हवर रात्री जीवाची मुंबई करण्यासाठी आलेल्या मुंबईकर तरुणांनी व्यक्तं केला आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा ड्रिम प्रोजेक्ट म्हणजेच मुंबई 24 तास खुली ठेवणं आहे. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू झाली.

आता रात्रभर मुंबईच्या काही भागातली हॉटेल्स, मॉल्स आणि खाऊ गल्ल्या सुरू राहणार आहेत. आत्तापर्यंत जीवाची मुंबई करण्यासाठी लोक येत, आता जेवायची मुंबई करण्यासाठी लोक येतील अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिलीय. यामुळे मुंबईची आर्थिक उलाढालही वाढेल असंही ते म्हणाले. मुंबई पोलीस आणि बेस्टने यासाठी खास उपायोजनाही केल्या आहेत. तरुणाईने या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

सरकारने अरहिवासी भाग असलेल्या जागांमध्ये जे मॉल्स आणि हॉटेल्स आहेत त्यांना 24 तास दुकाने खुली ठेवण्याची परवानगी दिली. मात्र पब आणि बारसाठीची वेळेची मर्यादा पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे. त्यात बदल होणार नाही असंही सरकारने सांगितलं आहे.

इतर बातम्या - CAA च्या विरोधात प्रस्ताव चुकीचा, नागरिकत्व कायद्याबद्दल ओम बिरलांचे EU पत्र

नाईट लाईफमुळे येत्या तीन वर्षांत किमान 5 लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल असा अंदाज राज्य सरकरारने व्यक्त केला आहे. या व्यवसायात गुंतलेल्या लोकांचे मासिक उत्पन्न किमान 10 हजार रुपयांवरून 50 हजार रुपयांपर्यंत वाढणे अपेक्षित आहे. राज्य सरकारचा हा निर्णय यशस्वी झाल्यास मुंबईत 20% रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

पोलिसांनी सुरक्षेसाठी खास फिरती पथकं तयार केली आहेत. तर बेस्ट पहाटे 4 पर्यंत एसी बसेस चालवणार आहे. सुरुवातीचे काही दिवस आढावा घेतल्यानंतर बेस्ट 24 तास आपली सेवा सुरू ठेवण्याचा विचार करत आहे.  24 तास हॉटेल्स सुरू ठेवण्याचा विचार सध्या तरी केवळ मुंबई पुरता आहे. पण पुण्यासारख्या शहरांनी तसा प्रस्ताव ठेवला तर त्याबाबत विचार केला जाईल. असे संकेत आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. मुंबईचा महसूल वाढण्यासाठी आम्ही 2013 मध्ये ही नाईट लाईफची संकल्पना मांडली होती. आता सात वर्षानंतर ही संकल्पना प्रत्यक्षात राबवण्यात येत आहे.

इतर बातम्या - NIA ची टीम रिकाम्या हाती माघारी परतली, राज्य सरकार घेणार मोठा निर्णय

'नाईट लाईफ नाही...ही तर किलींग लाईफ'

'ही नाईट लाईफ नसून किलींग लाईफ आहे. कमला मिल येथे आग लागली त्यात 14 जणांचा मृत्यू झाला. मुंबईच्या नाईट लाईफला रक्तरंजित इतिहास आहे, हे निर्णय घेणाऱ्यांना माहिती नाही का?' असा सवाल करत भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 28, 2020 07:23 AM IST

ताज्या बातम्या