मुंबईला नशेत बुडवणारे 'नायजेरियन' रॅकेट उध्वस्त, पोलिसांची मोठी कारवाई

मुंबईला नशेत बुडवणारे 'नायजेरियन' रॅकेट उध्वस्त, पोलिसांची मोठी कारवाई

मुंबईमध्ये ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या नायजेरियन टोळीतील एकाला मुंबई पोलीस आणि आरपीएफने ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांनी ही सगळ्यात मोठी कारावई केली आहे.

  • Share this:

दिवाकर सिंग, प्रतिनिधी

मुंबई, 18 ऑक्टोबर : मुंबईमध्ये ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या नायजेरियन टोळीतील एकाला मुंबई पोलीस आणि आरपीएफने ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांनी ही सगळ्यात मोठी कारावई केली आहे. काही नायजेरियन लोक संयुक्त अभियानात ड्रग्ज पुरवठा करत होते. पण मुंबई पोलिसांनी यावर कारवाई केली आहे.

मुंबईच्या माझगाव परिसरात रात्रीच्या सुमारास हा छापा टाकण्यात आला. काही नायजेरियन लोक या ठिकाणी ड्रग्ज पुरवठा करत असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या हाती लागली. ही टोळी हाणून पाडण्यासाठी पोलीस आणि आरपीएफ यांनी मिळून मोठा सापळा रचला आणि त्यांच्या अड्ड्यावर रात्रीच छापा टाकला.

या छाप्यामध्ये एका ड्रग्ज माफियाला अटक करण्यात आली आहे. तर ही कारवाई करताना एक आरपीएफ जवान जखमी झाला आहे. पोलिसांनी आणि आरपीएफने घटनास्थळी मोठा सापळा रचला आणि या ड्रग्ज माफियांना रंगे हात पकडलं.

अचानक पोलिसांना पाहिल्यानंतर मोठी खळबळ उडाली आणि पळापळ सुरू झाली. यावेळी पोलिसांनी मारहाण करण्यास सुरूवात केली आणि यात एक आरपीएफ जवानही जखमी झाला. त्यांच्यावर सध्या जेजे रुग्णालायात उपचार सुरू आहे. तर यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आधीच हल्लीची तरुणाई मादक पदार्थांच्या आहेरी जात आहे. त्यात अशा टोळ्यांचा भारतात हस्तक्षेप वाढला तर भविष्यात काय होईल याचा नेम नाही. त्यामुळे अटक केलेल्या ड्रग्ज माफियाची पोलीस कसून चौकशी करणार आहे. यात आणखी कुठे असे प्रकार तर सुरू नाही याचा आता पोलीस शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे.

बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींची तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2018 08:49 AM IST

ताज्या बातम्या