कोरोनासंदर्भात रुग्णालयांना नवे आदेश, पालिकेने पत्रक काढून दिली शेवटची तंबी

कोरोनासंदर्भात रुग्णालयांना नवे आदेश, पालिकेने पत्रक काढून दिली शेवटची तंबी

रुग्णालयांनी जर ही माहिती 48 तासात पुरवली नाही तर एपीडमीक कायद्याअंतर्गत 1897 अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.

  • Share this:

मुंबई, 18 जून : राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशात मुंबईच्या मनपा हद्दीतील रुग्णालयांना 48 तासाच्या आत कोव्हिड -19 रुग्णांच्या मृत्यूची माहिती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंबंधी परिपत्रक काढून पालिकेने रुग्णालयांना शेवटची तंबी दिली आहे. रुग्णालयांनी जर ही माहिती 48 तासात पुरवली नाही तर एपीडमीक कायद्याअंतर्गत 1897 अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.

खरंतर, 862 मृत्यूची माहिती 15 जूनपर्यंत दिल्याने एकत्र इतक्या मृत्यूच्या नोंदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई मनपा आयुक्त यांनी हा आदेश दिला आहे. एकीकडे राज्यात रुग्णवाढीचा दर मंदावल्याचा दावा सरकारने केला असला, तरी दररोज निदान होणाऱ्या रुग्णांच्या एक दिवसाच्या संख्येत कपात झालेली दिसत नाही. आज दिवसभरात 3752 रुग्ण वाढले. महाराष्ट्राचा कोविड मृत्यूदरही देशाच्या तुलनेत जास्तच आहे. देशाचा सरासरी कोविड मृत्यूदर 3.36 आहे. तोही गेल्याच आठवड्यात 2.8 वरून वाढून एवढा झाला आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर 4.77 झाला आहे.

भूकंपाच्या धक्क्याने मिझोराम हादरलं, न्यूझीलंडमध्ये हादऱ्यामुळे त्सुनामीची भीती

आज दिवसभरात 1672 रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरं होणाऱ्या रुग्णांची संख्या अॅक्टिव्ह रुग्णसंख्येपेक्षा वाढली आहे. त्यामुळे दिलासा मिळाला असला, तरी नव्या रुग्णांच्यात वाढ कायम आहे. सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार रुग्णवाढीचा दर कमी झाल्याची नोंद दिसते. 16 जूनच्या आठवड्यात रुग्णवाढीचा साप्ताहिक दर 3 टक्क्यांवर आला आहे. तो 31 मे च्या आठवड्यात 4 टक्के होता. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये वाढ होत असली, तरी बरे झालेल्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने ही आकडेवारी समोर दिसत आहे.

धक्कादायक! भिंत अंगावर कोसळून दोन चिमुकल्या मुलींचा जागीच मृत्यू

संपादन - रेणुका धायबर

First published: June 18, 2020, 9:54 PM IST

ताज्या बातम्या