• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • मुंबई मनपाची पहिल्यांदाच मोठी कारवाई, तब्बल 4300 गाड्यांवर चालवला जेसीबी

मुंबई मनपाची पहिल्यांदाच मोठी कारवाई, तब्बल 4300 गाड्यांवर चालवला जेसीबी

पहिल्यांदाच अशा प्रकारची कारवाई केली जात असल्यामुळे अनअधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांवर चाप बसणार आहे.

  • Share this:
मुंबई, 21 डिसेंबर : मुंबई मनपाने आज मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये पालिकेने थेट 4300 गाड्यांवर जेसीबी चालवला आहे. मुंबई मनपाच्या लायसन्स विभागाने ही कारवाई केली. ज्यामध्ये 4300 गाड्यांवर जेसीबी चालवत या गाड्या नष्ट केल्या. पहिल्यांदाच अशा प्रकारची कारवाई केली जात असल्यामुळे अनअधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांवर चाप बसणार आहे. एखादी गाडी मनपाच्या कारवाईत जप्त केली गेली तर तिला व्यापारी दंड भरून पुन्हा सोडवतात आणि अनधिकृतपणे व्यवसाय करण्यासाठी वापरतात. पण अशा कामांसाठी वापणाऱ्या गाड्यांवर कठोर कारवाई करण्याची ही पालिकेची पहिलीच वेळ आहे. पालिकेने केवळ हे स्टंट म्हणून न करता यात सातत्य राखलं पाहिलं आहे असं सामान्य नागरिकांचं म्हणणं आहे. पालिकेच्या या कारवाईमुळे मुंबईत अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना चाप बसेल. दरम्यान, पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे महाराष्ट्रात रस्ते अपघात वाढले आहेत. महाराष्ट्रात रस्ते अपघातात बळींचा आकडा ऐकूण तुम्हाला धक्का बसल्या शिवाय राहाणार नाही.  गेल्या 11 महिन्यात तब्बल 11 हजारजणांना आपला जीव गमवावा लागला. अपघाताच्या विळख्यात महाराष्ट्र महाराष्ट्रात 30 हजाराहून अधिक अपघात झाले आहेत. आणि जवळपास 11 हजार जाणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तुलेनेन हा आकडा गेल्या वर्षीपेक्षा कमी असला तरी राज्यातले रस्ते आणि गाडी चालवणारे यांच्या एकत्रित प्रयत्नानं मृत्युचा हा आकडा कमी होऊ शकतो. महाराष्ट्रात जानेवारी ते नोव्हेंबर या काळात 30 हजार 80 अपघात झाले. त्यामध्ये 11 हजार 387 जणांचा मृत्यू ओढावला तर 26 हजार 428 जण जखमी झाले. 2018 मध्ये याच काळात राज्यात 32 हजार 493 अपघात झाले. त्यामध्ये 12 हजार 14 जणांचा मृत्यू तर 28740 जण जखमी झाले होते. परिवहन विभागाच्या टीमनं रस्त्यावरच्या अपघातग्रस्त ठिकणांचं सर्वेक्षण केलं असून त्यामध्ये ही माहिती पुढं आली आहे. सर्वाधिक अपघात हे मुंबई शहरात सर्वाधिक अपघात हे मुंबई शहरात (2604) झालेत. पुण्यात 1638, अहमदनगर 1494 तर नाशिकमध्ये 1250 इतके अपघात  झालेत. राज्यभरातील रस्त्यांवर 1326 ब्लॅक स्पॉट अर्थात अपघाती ठिकाणं आहेत. अशा ठिकाणांवर कायमस्वरूपी उपाययोजाना  करण्यासाठी  परिवहन विभागाकडून प्रयत्न केला जात आहे. एकीकडं अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाकडून प्रयत्न केला जातोय तर दुसरीकडं वाहन चालकांनीही काळजी घेण्याची आवश्यकता  आहे, तरचं अपघाताचं प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
Published by:Renuka Dhaybar
First published: