मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेचा उमेदवार ठरला, 'या' नावावर झालं शिक्कामोर्तब

मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेचा उमेदवार ठरला, 'या' नावावर झालं शिक्कामोर्तब

मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची निवड होणार आहे. शिवसेनेकडून नगरसेविका किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.

  • Share this:

मुंबई, 18 नोव्हेंबर : मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची निवड होणार आहे. शिवसेनेकडून नगरसेविका किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. पेडणेकर यांच्या नावाची बिनविरोध निवड होण्यात शक्यता आहे. दरम्यान, भाजपनेही महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे.

महापौरपदाच्या निवडीसाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांचं नाव आघाडीवर होतं. रमाकांत रहाटे आणि यशवंत जाधव यांचीही नावं चर्चेत होती. परंतु, किशोरी पेडणेकर यांनी यात बाजी मारली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून मुंबई महापौर पदासाठी शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपमहापौरपदासाठी नगरसेवक अँड. सुहास वाडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. थोड्याच वेळात महापालिका मुख्यालयात आयुक्त सचिवांकडे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

किशोरी पेडणेकर या तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्यात. आजपर्यंत त्यांना एकही मोठ पद मिळालं नाही. मध्यतंरीच्या काळात एका वर्षासाठी स्थापत्य शहर समितीच्या अध्यक्षा होत्या. पेडणेकर यांना पालिका कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात आदित्य ठाकरेंच्या प्रचारात त्यांचे महत्वाचे योगदान होते.

दरम्यान, राज्यात भाजप आणि शिवसेनेत संबंध ताणले गेले आहे. त्याचे पडसाद मुंबई पालिकेच्या निवडणुकीवर पडणार अशी शक्यता होती. परंतु, भाजपने महापौरपदाच्या निवडीसाठी उमेदवार देणार नाही, अशी घोषणा केली आहे. येणाऱ्या २०२० च्या पालिका निवडणुकीमध्ये मुंबईचा महापौर स्वबळावर असेल आणि तो भाजपचाच असेल, असा विश्वास भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केला.

==================

Published by: sachin Salve
First published: November 18, 2019, 5:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading