Home /News /news /

मुंबई: प्रेमात आडवी आली गर्लफ्रेंडची आई, रागात प्रियकराने केलं धक्कादायक कृत्य

मुंबई: प्रेमात आडवी आली गर्लफ्रेंडची आई, रागात प्रियकराने केलं धक्कादायक कृत्य

मुंबईमध्येही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गर्लफ्रेंडच्या आईने लग्नासाठी नकार दिल्यानंतर 30 वर्षीय व्यक्तीने गर्लफ्रेंडचं अख्खं घरच पेटवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

    मुंबई, 01 जानेवारी : प्रेमात नकार मिळाल्यानंतर गुन्हा घडल्याच्या अनेक धक्कादायक घटना तुम्ही पाहिल्या असतील. मुंबईमध्येही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गर्लफ्रेंडच्या आईने लग्नासाठी नकार दिल्यानंतर 30 वर्षीय व्यक्तीने गर्लफ्रेंडचं अख्खं घरच पेटवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. घराला आग लागल्याची घटना उल्हासनगरमध्ये समोर आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुलगा बेरोजगार असल्यामुळे मुलीच्या आईने त्यांच्या लग्नाला विरोध केला. सोमवारी आरोपींनी मुलीच्या आईकडे तिचा हात मागितला होता पण त्यांनी लग्न करण्यास नकार दिल्यास. त्यामुळे रागात व्यक्तीने घराला आग लावण्याची धमकी दिली. पण तरीदेखील नकार दिल्यानंतर आरोपीने ताबडतोब काडीपेटीने कपड्यांच्या ढिगाला आग लागली. कपड्यांना लागलेली आग पटकन पसरली आणि सर्व कपडे जळून खाक झाले. आग वेळीच आटोक्यात आणल्यामुळे यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. इतर बातम्या - प्रसिद्ध गायक अजय पाठकसह पत्नी आणि मुलीची घरात हत्या, 10 वर्षाच्या मुलाला जाळलं वरिष्ठ निरीक्षक सुधाकर सुरडकर (Senior Inspector Sudhakar Suradkar)म्हणाले की, आरोपी अशोक वाघमारे आणि रेखा मारुतीया एकमेकांवर प्रेम करतात आणि त्यांना लग्न करायचं होतं, पण या मुलीची 54 वर्षीय आई नात्याच्या आड आली. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे. घटनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलीस घराची झडती घेत असून गर्लफ्रेंड आणि तिच्या आईचीदेखील चौकशी करण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, अशीच एक घटना जुलैमध्ये मुंबईत घडली होती. एका व्यक्तीने अंधेरी येथील आपल्या एक्स मैत्रिणीच्या घरात आग लावली कारण तिच्या गर्लफ्रेंडने त्याच्याशी बोलणे बंद केले. आरोपींवर खुनाचा विनयभंग, विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. इतर बातम्या - शिवसेना मंत्र्याच्या स्वागतासाठी झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी, दोन महिला जखमी
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Mumbai, मुंबई

    पुढील बातम्या