राज्य सरकार म्हणतंय, मेट्रो-3 च्या कामाचं ध्वनीप्रदुषण कमीच!

राज्य सरकार म्हणतंय, मेट्रो-3 च्या कामाचं ध्वनीप्रदुषण कमीच!

मुंबई मेट्रोच्या कामामुळे नेमकं किती ध्वनीप्रदुषण होणार आहे, त्याबाबत राज्य सरकारच्यावतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं.

  • Share this:

मुंबई, 02 जुलै :  रस्त्याच्या वाहनांचे आवाज, मशिदींवरील भोंगे, विविध विकासकामातून निर्माण होणारं ध्वनीप्रदुषण यामुळे मुंबई आधीच कान बंद करून बसलीये. त्यामुळे मेट्रोच्या कामातून होणाऱ्या ध्वनी प्रदुषणाचा उगीच कशाला बाऊ का केला जातोय मुंबईतील आवाजाची पातळी आधीच जास्त असून मेट्रोच्या कामाचा या आवाजाच्या पातळीवर काही फरक पडणार नाही असा दावा राज्य सरकारच्या वतीनं हायकोर्टात करण्यात आलाय.

मुंबई मेट्रोच्या कामामुळे नेमकं किती ध्वनीप्रदुषण होणार आहे, त्याबाबत राज्य सरकारच्यावतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं. 'नीरी' या संस्थेने केलेल्या तपासणीत शहरात सरासरी ८० डेसीबल इतका आवाज होत असून मेट्रोच्या बांधकामाचा आवाज यापेक्षा कमी आहे असा दावा सरकारने यावेळी केला. ध्वनीप्रदुषणाचा रहिवाश्यांना त्रास झाल्यास त्यांनी कुठे तक्रार नोंदवायची त्याबाबत मेट्रो प्रशासनाने काही योजना केली आहे का? अशी विचारणा हायकोर्टाने गेल्या सुनावणीवेळी केली होती.

त्यावर उत्तर देताना मेट्रो प्रशासनाने आज सांगितले की, इमेलद्वारे रहिवासी मेट्रोच्या ध्वनीप्रदुषणाबाबत तक्रारी करू शकतात. मात्र जर एखाद्या रात्री या आवाजाचा जास्तच त्रास होऊ लागला तर काय करायचं? या ईमेलद्वारे केलेल्या तक्रारींचं ताबडतोब निवारण कसं शक्य आहे? असा सवाल हायकोर्टानं उपस्थित केला.

ध्वनीप्रदुषणाच्या मुद्यावरून हायकोर्टाने डिसेंबर २०१७ पासून मेट्रो-३ साठीच्या रात्र पाळीच्या कामावर बंदी घातली आहे. याचा फटका मेट्रो प्रशासनाला बसला असून त्यामुळे कामाची डेडलाईन हुकण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी दक्षिण मुंबईत मेट्रो-३चे काम २४ तास सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी अशी याचिका मुंबई मेट्रो प्रशासनाने हायकोर्टाकडे केली आहे.

याला दक्षिण मुंबईतील स्थानिक रहिवासी रॉबीन जयसिंघानी यांनी आक्षेप घेतला असून मेट्रोच्या रात्रपाळीच्या कामामुळे रहिवाश्यांना ध्वनीप्रदुषणाचा त्रास होणार असल्याचा दावा केला आहे. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी सुरू आहे.

हेही वाचा

होता वसीम म्हणून वाचले 5 हिंदू बांधव!

हा घ्या 30 लाखांचा चेक!,तिकीटासाठी भाजप नेत्याची पक्षालाच आॅफर

लाज कशी वाटत नाही?, कर्ज देण्यासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी

 सतराशे कोटींची जमीन बिल्डरच्या घशात, काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप

  'काँग्रेसवर भाजपचा 500 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

First published: July 2, 2018, 10:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading