मुंबई- मनमाड राज्यराणी एक्स्प्रेसची दुर्घटना थोडक्यात टळली

मुंबई- मनमाड राज्यराणी एक्स्प्रेसची दुर्घटना थोडक्यात टळली

त्यांनी राज्यराणी एक्स्प्रेसच्या दिशेने धाव घेऊन गाडी थांबली

  • Share this:

मुंबई- मनमाड राज्यराणी एक्स्प्रेसची दुर्घटना थोडक्यात टळली. रापली गेटजवळ रेल्वे रूळाला तडा गेला होता. रेल्वे कर्मचारी चेतन अहिरे आणि काशिनाथ ठाकरे यांनी हा तडा पाहिला. त्यानंतर त्यांनी तातडीनं राज्यराणी एक्स्प्रेस थांबवली. यानंतर रूळाची दुरूस्ती केल्यानंतर रेल्वे पुढे रवाना करण्यात आली.

मनमाडपासून थोड्याशा अंतरावर असलेल्या रापली गेटवर रेल्वे रुळाला तडा गेला होता. थोड्याच वेळात त्या मार्गावरून मनमाड- मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस धावणार होती. पण चेतन आणि काशिनाथ यांनी रुळाला गेलेला तडा पाहिला आणि वेळीच रेल्वे प्रशासनाला धोक्याची सुचना दिली.

युनिट नंबर ६ चे कर्मचारी चेतन आहिरे काशीनाथ ठाकरे यांनी तडा गेलेला रुळ पहिल्यानंतर, समोरून येणाऱ्या राज्यराणी एक्स्प्रेसच्या दिशेने धाव घेऊन गाडी थांबली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा शेकडो प्रवाशांचे प्राण धोक्यात होते. रुळाची दुरुस्ती केल्यानंतर गाडी मुंबईकडे एका तासानंतर रवाना झाली.

'बर्निंग कार' रस्त्यावर धावत होती, VIDEO व्हायरल

First published: November 9, 2018, 10:17 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading