मुंबई, 29 जानेवारी : नालासोपारा परिसरात WHATSAPP ग्रुपचा वापर करून सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा तुळींज पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातून ३ पिडीत मुलींची सुटका करण्यात आली आहे. तर हे रॅकेट चालवणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
नालासोपाऱ्यात बिलालपाडा, गावराई पाडा इंथ सोशल मीडियाचा वापर करून सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी बोगस क्लाईंट बनून फोन केला. त्यानंतर त्यांना मुलींचे काही फोटो पाठवून अडीच ते तीन हजारचा रेट ठरवण्यात आला.
या सगळ्यानंतर पोलिसांनी सापळा रचून रंगेहात या प्रकरणाचा छडा लावला. आणि हे सेक्स रॅकेट उधळून लावलं. यातून पोलिसांनी 2 पिडीत मुलींची सुटका केली आहे. तर सगळ्यात धक्कादायक म्हणजे हे सेक्स रॅकेट महिला चालवत होती. तिलाही तुळींज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
VIDEO : गावी गेलेला पती घरी आला, पत्नीला दोन तरुणांसह रंगेहाथ पकडलं..
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा