मुंबई-लखनौ पुष्पक एक्स्प्रेसचा कोच रुळावरून घसरला, वाहतूक विस्कळीत

मुंबई-लखनौ पुष्पक एक्स्प्रेसचा कोच रुळावरून घसरला, वाहतूक विस्कळीत

ऐन दिवाळीच्या गर्दीमध्ये रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.

  • Share this:

बब्बु शेख,(प्रतिनिधी)

मनमाड,26 ऑक्टोबर: मुंबई-लखनौ पुष्पक एक्स्प्रेसचा एक कोच (डबा) रुळावरून घसरला. इगतपुरीच्या रेल्वे स्थानकावरील प्लॉटफॉर्म क्रमांक तीनवर शनिवारी ही घटना घडली. इगतपुरी स्टेशनवर पुष्पक एक्स्प्रेस आली असता जनरल कोच रुळावरून घसरली. यावेळी एक्स्प्रेसचा वेग कमी असल्याने मोठी अनर्थ टळला. या अपघातामुळे मुंबईकडून-नाशिककडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन दिवाळीच्या गर्दीमध्ये रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.

रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. कोचमधील प्रवाशांना खाली उतरवण्यात आले आहे. दुरुस्ताचे काम सुरू करण्यात आले असून मुंबईकडून-नाशिक मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी किमान दीड ते दोन तास लागतील, अशी माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.

रुळाला गेला तडा... मध्यरेल्वेचे वेळापत्रक कोलमडलं

दरम्यान, ठाणे-डोंबिवली स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे मध्येरेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. रुळ दुरूस्त करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरही परिणाम झाला असून लांब पल्ल्यांच्या गाड्या ठाणे आणि दादार स्थानकात काही काळ रखडल्या होत्या.

ऐन दिवाळीत खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठांमध्ये लगबग असते. याशिवाय चाकरमाने येत असतात. अशावेळी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे मध्यरेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. पारसिक बोगद्याजवळ रुळाला तडा गेल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मध्यरेल्वेची मुंबईच्या दिशेने येणारी अपजलद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान नागरिक ट्रेनमधून उतरून चालत जात आहेत. मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या गाड्यांच्या लांबच लांब रांग पाहायला मिळत आहे. रेल्वे रुळ दुरुस्त करण्याचं काम रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे.

पंतप्रधान असावे तर असे, एकदा हा VIDEO पाहाच!

First published: October 26, 2019, 12:13 PM IST
Tags: derailed

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading