लव्हस्टोरीचा दुखद 'द एन्ड', सेल्फी VIDEO काढून ट्रेनखाली मारली उडी

लव्हस्टोरीचा दुखद 'द एन्ड', सेल्फी VIDEO काढून ट्रेनखाली मारली उडी

प्रेयसीसोबत भांडण झाल्यानं प्रियकराने धावत्या रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना विठ्ठलवाडी स्थानकात घडलीये.

  • Share this:

कल्याण, 31 जुलै : प्रेयसीसोबत भांडण झाल्यानं प्रियकराने धावत्या रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना विठ्ठलवाडी स्थानकात घडलीये. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी प्रियकराने मोबाईलमध्ये सेल्फी व्हिडिओ घेत आत्महत्येचे कारण सांगितल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राजेश भंडारी असे आत्महत्या करणाऱ्या प्रियकराचे नाव आहे.

चाकणच्या हिंसेत पोलीस कर्मचाऱ्याला जबर मारहाण, प्रकृती धोक्याबाहेर

मृत राजेश हा कल्याणजवळच्या मोहने गावात राहणारा होता. त्याचे त्याच परिसरातील एका तरुणीशी गेल्या ५ वर्षापासून प्रेमसंबंध होते. त्यानंतर दोघांच्या घरी यांच्या प्रेमसंबंधाची खबर लागल्याने तरुणीच्या घरच्यांनी आधी विरोध केला होता. तरीही या दोघांचे प्रेमसंबंध सुरुच होते. त्यानंतर दोघांच्या घरच्यांच्या सहमतीने त्यांचे लग्नही होणार होते. मात्र, गुरुवारी २६ जुलैला प्रेयसीने राजेशला विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनवर भेटण्यासाठी बोलावले होते. त्यावेळी राजेश या ठिकाणी गेला असता, दोघांमध्ये काही कारणावरून जोरदार वाद झाल्याने रेल्वे स्टेशन परिसरात गोंधळ उडाला होता. हा गोंधळ पाहून पोलीस कर्माचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन दोघांनाही तेथून हुसकावून लावलं.

मात्र, काही वेळाने मृत राजेशने स्वत:च्या मोबाईलमध्ये सेल्फी व्हिडीओ काढत, मी विठ्ठलवाडी स्टेशनजवळ उभा असून प्रेयसीच्या छळाला कंटाळून रेल्वेखाली आत्महत्या करीत आहे. या मोबाईलमध्ये असलेला लॉककोड माझ्या मित्राला माहिती आहे. असा सेल्फी व्हिडिओ त्याने बनवला होता. या घटनेची कल्याण जीआरपी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अद्याप कुणाच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

हेही वाचा...

चाकणच्या हिंसक आंदोलनात झालं 8 कोटी रुपयांचं नुकसान!

मुंबई- पुणे इंटरसिटी एक्सप्रेस अपघात टळला

चाकणच्या हिंसक आंदोलनामागे 'बाहेरच्यांची' घुसखोरी?

First published: July 31, 2018, 2:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading