मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

महत्त्वाची बातमी : मुंबईची लोकल बंद होणार नाही

महत्त्वाची बातमी : मुंबईची लोकल बंद होणार नाही

पुढचे 7 दिवस सरकारी कार्यालयं बंद राहतील पण मुंबईत लोकल आणि बससेवा बंद राहणार नाही, असा मोठा निर्णय घेण्यात आला.

मुंबई, 17 मार्च : महाराष्ट्रात Coronavirus ने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 41 वर पोहोचली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गर्दीला आळा घालण्यासाठी रेल्वे आणि बससेवा बंद करण्याविषयी चर्चा झाली. पण मुंबईत लोकल आणि बससेवा बंद राहणार नाहीत, असा मोठा निर्णय घेण्यात आला. राज्यभर वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी राज्य शासन कठोर उपाययोजना करणार असल्याचं स्पष्ट आहे. राज्यात Covid-19 पॉझिटिव्ह असलेल्या पहिल्या रुग्णाचा 17 मार्चला मृत्यू झाला. तो मुंबईत दाखल होता. त्यामुळे देशाच्या आर्थिक राजधानीत खळबळ उडाली आहे. मुंबईत कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लोकलची गर्दी कमी होणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे लोकल आणि मेट्रो बंदीच्या निर्णयाकडे अनेकांचं लक्ष होतं. लोकल आणि बस सेवा सध्या तरी बंद होणार नसली तरी, पुढचे 7 दिवस केवळ अत्यावश्यक सेवा वगळता सरकारी कार्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आवा आहे .नागरिकांनी ई मेल मार्फत आपल्या तक्रारी कराव्यात असं आवाहन सरकार करणार आहे.
First published:

पुढील बातम्या