या 3 कारणांमुळे मुंबईची लाईफलाईन झाली 'डेथ'लाईन, 16 दिवसांत घेतला 137 जणांचा जीव

या 3 कारणांमुळे मुंबईची लाईफलाईन झाली 'डेथ'लाईन, 16 दिवसांत घेतला 137 जणांचा जीव

मुंबईची लोकल म्हणजे मुंबईत कुठेही जलद पोहोचण्याचं साधन. पण हीच लोकल अनेकांना मृत्यपाशी घेऊन जायलाही कारणीभूत ठरतेय.

  • Share this:

स्वाती लोखंडे, प्रतिनिधी

मुंबई, 18 ऑगस्ट : मुंबईची लोकल म्हणजे मुंबईत कुठेही जलद पोहोचण्याचं साधन. पण हीच लोकल अनेकांना मृत्यपाशी घेऊन जायलाही कारणीभूत ठरतेय. याच मुंबईलोकलवर ऑगस्ट महिन्याच्या 16 दिवसांत 137 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलाय. तर 157 प्रावासी जखमी झालेत. ज्यापैकी अनेकांना कायमचं अपंगत्वही आलं आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या तुलनेत मध्य रेल्वेर मृतांची आणि जखमींची संख्या खुप जास्त आहे. लोकलवरच्या मृत्युचा हा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. लोकसंख्या वाढतेय त्या तुलनेत मुंबईतल्या पायाभुत सुविधा मात्र वाढत नाहीयेत. लोकांची संख्या आणि ट्रॅकच्या संख्येत वाढ आणि सुधारणा न होणं ही साततत्यानं अपघाताची कारणं सांगितली जातात. पण महत्वाची तीन कारणं आहेत ज्यानं अपघात वाढतायत.

1)लोकल रद्द करणं

काही अपरिहार्य कारणांमुळे अनेकदा लोकल रद्द केल्या जातात. गर्दीच्या वेळी गाड्या रद्द केल्यानं मग रद्द केलेल्या गाडीनंतर येणाऱ्या लोकलमध्ये दोन्ही गाड्यांचे प्रवासी चढायचा प्रयत्न करता. यात काहीजण दरवाजाला लटकतात.. काही खिडकी आणि दरवाजाचा आधार घेउन बाहेर लोंबकळतात.. अशावेळी अपघात होणं साहजिक आहे.

2) लोकल उशीरानं धावणं

बायोमेट्रिक पंचिग मुळे वेळेत पोहोचण्याची कसरत.. किंवा लेटमार्क मार्क नको म्हणून सकाळची धावाधाव कुणाला चुकली नाही. अशात एखादी ट्रेन10-12 मिनिटे जरी उशीरा झाली तर मग जीसमोर आली गाडीत त्यात चढा, असा आवेश असतो प्रवाशांचा.. आणि तोच आवेश त्यांच्या जीवावर कधीकधी उठतो.. घड्याळ्याच्या काट्यानुसार त्याचं जीनं घड्याळाचा काटा पाळण्याच्या नादातच संपत

3) नियोजित प्लॅटफॉर्म ऐनवेळी बदलणं

गर्दीच्या वेळी एखादी गाडी 3 नंबर प्लॅटफॉर्मऐवजी 5 नंबर प्लॅटफॉर्मवर येईल असं जेव्हा घोषित केलं जातं. आणि अवध्या काही सेकंदांचा अवधी असतो. तेव्हा पादचारी पुलावरच्या गर्दीऐवजी प्रवासी ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न करतात आणि एखाद्या भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रेनखाली चिरडले जातात.

आता नजर टाकुया या वर्षातील रेल्वे प्रवाशांच्या मृत्युच्या आकडेवारीवर

1 जानेवारी 2018 ते 16 ऑगस्ट 2018 पर्यंत म्हणजे अवघ्या साजेसात महिन्यांच्या कालावधीत 1835 जणांना आपला जीव गमवावा लागलाय तर 1980 प्रवासी जखमी झालेत. रेल्वे पोलीस स्टेशननिहाय संख्या अशी आहे.

रेल्वे पोलीस स्टेशन मृत्यूची संख्या

कल्याण      223

कुर्ला        219

ठाणे        199

बोरीवली     176

वसई       146

वाशी       109

या वर्षातील सगळ्यात जास्त मृत्यु झाले आहेत. यावरील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आकडेवारी विचार करायला भाग पाडतेय की लाईफलाईन म्हणुन ओळखली जाणारी मुंबई लोकल डेथलाईन किंवा मृत्युचा सापळा होत चाललीय का?

 

PHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड

First published: August 18, 2018, 7:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading