तुटलेला रेल्वे रूळ चिंधीनं बांधला,लोकलही नेली

ही लोकल सेवा सुरळीत करताना रेल्वे कर्मचारी कसं प्रवाशांच्या जीवाशी खेळताहेत हे याचं मूर्तीमंद उदाहरण समोर आलंय.

News18 Lokmat | Updated On: Jul 10, 2018 11:23 PM IST

तुटलेला रेल्वे रूळ चिंधीनं बांधला,लोकलही नेली

मुंबई,10 जुलै : मुंबई आणि उपनगराला पावसाने झोडपून काढले. मुसळधार पावसाचा मोठा फटका लोकल सेवेला बसलाय. ही लोकल सेवा सुरळीत करताना रेल्वे कर्मचारी कसं प्रवाशांच्या जीवाशी खेळताहेत हे याचं मूर्तीमंद उदाहरण समोर आलंय. मानखुर्द इथं रेल्वे रूळाला तडा गेला होता. हा तडा गेलेला रूळ सांधण्यासाठी एका रेल्वे कर्मचाऱ्यानं चक्क कापडाचा वापर केला.  कापडाच्या चिंधीनं रूळ बांधून त्यावरून मग दोन ते तीन लोकलही चालवण्यात आल्या. चिंधी बांधलेल्या रूळावरून लोकल चालवण्यामुळं प्रवाशांचा जीव संकटात येऊ शकतो याबाबत कोणतीही फिकीर या रेल्वे अधिकाऱ्यांनी केली नाही.

VIDEO : ओव्हरटेक नडला, ट्रकला रिंगण घालून कार उलटी फिरली

दिवसभर मुंबईत पाऊस पडत आहे याचा परिणाम रस्ते,रेल्वे आणि हवाई वाहतुकीवरही झाला आहे. मुसळधार पावसानं रेल्वे ट्रॅकवर जागोजागी पाणी साचलं आहे. त्यामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झालाय. ऐन संध्याकाळी गर्दीच्या वेळी मानखुर्द ते गोवंडी स्टेशन दरम्यान रुळाला तडा गेला. यामुळे सी एस एम टी कडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. रेल्वे कर्मचारी रूळ दुरुस्त करण्यासाठी पोहचले पण त्यांनी शक्कल लढवत या तडा गेलेल्या रुळाला कपड्याच्या चिंधीने बांधून तो रूळ दुरुस्त करण्याचा अजब प्रकार केला आहे. विशेष म्हणजे यावरून दोन ते तीन लोकल सुद्धा चालवण्यात आल्याचं कळतंय. यामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रयत्न म्हणावा लागेल.

VIDEO : दुर्दैवी!,आईचा मृतदेह दुचाकीवर बांधून पोस्टमाॅर्टमसाठी घेऊन गेला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 10, 2018 11:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...