मुंबई,ता.5 जुलै: जुहू चौपाटीवर संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास पाच जण बुडाले. यापैकी एकाला वाचवण्यात यश आलं आहे तर इतर चौघांचा शोध सुरू आहे. वाचवलेल्या मुलाचं नाव वसिम खान असं आहे. समुद्र खवळलेला असताना हे पाचही जण पोहोण्यासाठी समुद्रात उतरले होते. 18 ते 20 वयोगटाते हे सगळे तरूण असून ते डीएननगरचे रहिवासी आहेत.
समुद्र खवळलेला असताना समुद्रात जावू नये अशा सूचना प्रशासनाने दिल्या होत्या, त्याकडे दुर्लक्ष करून हे तरूण पोहोण्यासाठी समुद्रात गेले होते. लाटांचा जोर जास्त असल्यानं त्यात हे खोल समुद्रात ओढले गेले. त्या पाच तरूणांपैकी फक्त एकाला वाचवण्यात यश आलं. इतर चार जणांचा शोध घेण्यात येत आहे.
पावसाळ्यात समुद्र जास्त खवळलेला असतो, त्यामुळे समुद्रात पोहोयला जाणं धोकादायक असतं. त्याबाबतच्या सूचना प्रशासन वारंवार देत असतं त्याकडे दुर्लक्ष करून तरूण समुद्रात जातात आणि जीव गमावून बसतात. सेल्फीच्या नादातही मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर अनेक तरूण-तरूणींना आपला जीव गमवावा लगाला असून अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे.
पर्यटनाचा आणि पावसाचा आनंद घेताना थोडी काळजी घेतली तर जीव गमवावा लागणार नाही. त्यामुळं समुद्र किनारी जाताना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
हेही वाचा...
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.