जोगेश्वरीत पालिकेच्या शाळेत 22 विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा

जोगेश्वरीत पालिकेच्या शाळेत 22 विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा

जोगेश्वरीतल्या शाळेतील 22 विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातील खिचडी खाल्यानं विषबाधा झालीये.

  • Share this:

13 डिसेंबर, मुंबई : जोगेश्वरीतल्या शाळेतील 22 विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातील खिचडी खाल्यानं विषबाधा झालीये. महानगरपालिकेच्या वतिनं या शाळांमध्ये मध्यान्ह भोजनासाठी खाजगी संस्थाना खिचडी वाटपाचे टेंडर देण्यात येतं. या संस्थेमार्फतच शाळेतील विद्यार्थनाही आहारात खिचडी वाटप होतं. जोगेश्वरी पूर्व येथिल बाल विकास शाळेतील विद्यार्थांना खिचडी देण्यात आली होती.  याच खिचडीतून शाळेतील 22 विद्यार्थना विषबाधा झाली आहे.

या सर्व बाधीत मुलांना शाळेजवळच्या कोकण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.  त्यांच्यावर उपचार सुरु आलेत. सर्व मुलांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच काळजीपूर्वक काम न करणाऱ्या संस्थेवर कारवाई करण्यात येईल असे सुधार समिती अध्यक्ष बाळ नर यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2017 06:33 PM IST

ताज्या बातम्या