IPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना

IPL 2019 : मुंबईच्या या फिरकीपटूनं एका ओव्हरमध्ये बदलला सामना

जस्थान रॉयल्सचा संघ प्ले ऑफमध्ये आपलं स्थान पक्क करण्यासाठी करो या मरोची लढाईत आहेत. तर, दुसरीकडं मुंबईचा संघ पुन्हा एकदा विजयाची हॅट्रीक करण्यास सज्ज झाला आहे.

  • Share this:

जयपूर, 20 एप्रिल : एकीकडं राजस्थान रॉयल्सचा संघ प्ले ऑफमध्ये आपलं स्थान पक्क करण्यासाठी करो या मरोची लढाईत आहेत. तर, दुसरीकडं मुंबईचा संघ पुन्हा एकदा विजयाची हॅट्रीक करण्यास सज्ज झाला आहे. मुंबई आणि राजस्थान यांच्यात जयपूरमध्ये सुरु असलेल्या सामन्यात पुर्व कर्णधार अजिंक्य रहाणेला कर्णधारपदावरुन हटवल्यामुळं राजस्थानचा संघ आपला नवीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ याच्या नेतृत्वाखाली खेळत आहे.

मुंबईनं दिलेल्या 162 धावांचा पाठलाग करताना, राहुल चहरनं सलामीच्या फलंदाजांना माघारी धाडलं. चहरनं अजिंक्य रहाणेला केवळ 12 धावांत बाद केलं. त्यानंतर आपल्या एकाच ओव्हरमध्ये चांगल्या लयीत असलेल्या संजू सॅमसनला 35 धावांवर बाद झाला. तर, बेन स्टोक्सला आपल्या पहिल्याच चेंडूवर भोपळा न फोडताच बाद झालाय राहुलनं आपल्या तीन आोव्हरमध्ये केवळ 19 धावा दिल्या आहेत. चहरच्या या गोलंदाजीमुळं मुंबईला विजयाच्या एका पाऊल पुढं नेलं आहे.

प्रथम टॉस जिंकत राजस्थाननं गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि हा निर्णय राजस्थानच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. श्रेयस गोपाळच्या किफायतशीर गोलंदाजीमुळं मुंबईला 161 धावा करता आल्या. यात डी कॉकच्या 65 धावांचे मोठे योगदान आहे. दरम्यान राजस्थाननं या सामन्यात अनेक झेल सोडले. यात आर्चरनं तीन महत्वाचे झेल सोडले. याचा फटका राजस्थानला नक्कीच बसणार आहे.

VIDEO : अखेर साध्वीच्या वादग्रस्त विधानावर उद्धव ठाकरे बोलले, म्हणाले...

First published: April 20, 2019, 6:56 PM IST
Tags: ipl 2019

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading