शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंना मुंबई हायकोर्टाने फटकारलं

या प्रकरणात पोलिसांनी जे या कार्यक्रमाचे आयोजक होते त्यांच्याऐवजी भलत्याच लोकांची नावं आयोजक म्हणून दिल्याबद्दल पोलिसांनाही फटकारून काढलंय.

Sachin Salve | Updated On: Jun 27, 2018 11:05 PM IST

शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंना मुंबई हायकोर्टाने फटकारलं

कल्याण, 27 जून : अंबरनाथमधील एका धार्मिक उत्सवाच्या वेळी कार्यक्रमाचं आयोजन करून ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मुबंई हायकोर्टाने शिवसेनेचे कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे यांना चांगलंच फटकारलंय.

कोर्टाचे आदेश माहिती असतानाही त्याचं उल्लंघन केल्याबद्दल कोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केली. या धार्मिक कार्यक्रमात रात्री १० वाजताची वेळ उलटून गेल्यानंतरही लाऊडस्पीकरचा वापर करण्यात आला होता. पुन्हा नियमांचे उल्लंघन करणार नाही, अशी लेखी हमी देण्याचेही हायकोर्टानं वकीलांमार्फत शिंदे यांना आदेश दिले आहेत.

या प्रकरणात पोलिसांनी जे या कार्यक्रमाचे आयोजक होते त्यांच्याऐवजी भलत्याच लोकांची नावं आयोजक म्हणून दिल्याबद्दल पोलिसांनाही फटकारून काढलंय.

हिराली फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेनं दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी दरम्यान कोर्टाने हे ताशेरे ओढले आहेत.

अकोल्याच्या एका पोलिसासह पाच पर्यटकांचा कळंगुट समुद्रात बुडून मृत्यू

VIDEO मालवणच्या रॉक गार्डनमध्ये सेल्फी काढत असताना आली मोठी लाट आणि...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 27, 2018 11:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close