मुख्यमंत्र्यांना न्यायालयाचा दणका, त्या चारही जणांना नगरसेवकपद बहाल!

मुख्यमंत्र्यांना न्यायालयाचा दणका, त्या चारही जणांना नगरसेवकपद बहाल!

भिवंडी महानगरपालिकेतील नगरसेवकांच्या निलंबन प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दणका दिला आहे. न्यायालयाने या तिन्ही नगरसेवकांचं निलंबनाचा निर्णय रद्द केला आहे.

  • Share this:

रवी शिंदे, प्रतिनिधी

भिवंडी, 16 एप्रिल :  भिवंडी महानगरपालिकेतील नगरसेवकांच्या निलंबन प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दणका दिला आहे. न्यायालयाने या तिन्ही नगरसेवकांचं निलंबनाचा निर्णय रद्द केला आहे.

भिवंडी महापालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक सिद्धेश्वर कामूर्ती, साजिद खान,राहुल खटके आणि शिवसेनेचे देवानंद थळे या नगरसेवकांचं मागील वर्षी स्वीकृत नगरसेवकपद रद्द करण्यात आलं होतं.

22 जुलै 2018 रोजी भाजप आमदार महेश चौघुले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तशी तक्रार केली होती.

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांनी तत्काळ चारही स्वीकृत नगरसेवकांचे पद निलंबन करण्याचा आदेश दिले होते.

त्यामुळे या चारही नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. अखेर वर्षभरानंतर आज न्यायालयाने मुख्यमंत्र्यांचा आदेश रद्द करून चारही स्वीकृत नगरसेवकांना पुन्हा पद बहाल केले आहे.

==============================

First published: April 16, 2019, 11:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading