मुंबई, 10 जुलै : गेल्या दोन दिवसात मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईत जागोजागी पाणी साचलं आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. काही ठिकाणी आपतकालीन परिस्थिती निर्माण झाली आहे आणि असं असतानाही राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले, 'शाळा बंद ठेवण्याची काही गरज नाही. हा हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा नाही तर फक्त मुसळधार पाऊस सुरू आहे.'
भरतीची वेळ सकाळी होती आणि आता थेट रात्री आहे. त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही आहे. सगळी यंत्रणा कामाला लागलेली आहे त्यामुळे आज शाळा - महाविद्यालयं यांना सुट्टी देण्याची गरज नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
LIVE : पावसामुळे जागोजागी कोंडी, घराबाहेर न पडण्याचा सल्ला
विरोधकांनी आम्हाला काम करण्याचा सल्ला देऊ नये. विरोधकांनी आणि इतर कोणी पॅनिक करायचा प्रयत्न करू नये. सेवा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत असं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीकाही केली. पण खरं पाहता अवघ्या मुंबापुरीला आज पावसाने झोडपून काढलं आहे. सगळीकडे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पण तरीही तावडे साहेब म्हणतात की मुलांनी शाळेत जावं. आता या गुडघ्याभर पाण्यात मुलं शाळेत जाणार तरी कशी हेही त्यांनी सांगावं.
दरम्यान, या सगळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मात्र भाजप आणि मुंबई महापालिकेवर मात्र टीका केली आहे. हवामान खात्याला काळजी आहे पण मुंबई महापालिकेला आणि राज्य सरकारला काडीमात्र काळजी नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा...
FIFA WC 2018: क्रोएशियाच्या राष्ट्रपती ग्राबर कीटारोविचे बोल्ड फोटोशूट
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Heavy Rain, Mumbai, Railway, ROAD TRAFFIC, School, Vinod tawade