BREAKING : हार्बर मार्गावर रेल्वे रुळाला तडे, सीएसटीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प

BREAKING : हार्बर मार्गावर रेल्वे रुळाला तडे, सीएसटीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प

  • Share this:

मुंबई, 14 जानेवारी : मुंबईच्या कुर्ला आणि तिळकनगर स्थानकादरम्यान रेल्वेच्या रुळाला तडे गेल्याची घटना घडली आहे. रेल्वे रुळाला तडे गेल्यामुळे हार्बर मार्गावरी वाहतूक ठप्प झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी असं झाल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. कामावर निघालेला मुंबईकर चांगलाच खोळंबला आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने हार्बर मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. तर रेल्वे रुळ दुरुस्त करण्याचं काम सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

(सविस्तर बातमी लवकरच)

First Published: Jan 14, 2019 10:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading