S M L

अन् लग्नाच्या पहिल्याच दिवशी यामीनला सत्य कळलं...

आपली फसवणूक झालीये हे पहिल्याच दिवशी कळूनही यामीन हनीमूनला गेला

Updated On: Aug 5, 2018 11:01 AM IST

अन् लग्नाच्या पहिल्याच दिवशी यामीनला सत्य कळलं...

गोवंडी, ०५ ऑगस्ट- मुंबईसारख्या महानगरात प्रेमविवाह करणं ही काही मोठी गोष्ट राहिली नाही. गोवंडीतल्या यामीन सय्यद नावाच्या मुलाचे एका तरुणीवर प्रेम होते. दोघांमधलं प्रेम फुलत गेलं आणि दोघांनी लग्न करण्याचा विचार केला. दोघांनी थाटामाटात लग्नही केलं. मात्र लग्नाच्या पहिल्या रात्री जे घडलं ते धक्कादायक होतं. यामीनचा लग्नाचा हा आनंद एक दिवसही टिकला नाही. कारण लग्नाच्या पहिल्या रात्रीच त्याला कळलं की त्याची प्रेयसी ‘ती’ नसून ‘तो’ आहे. लग्नाच्या पहिल्याच रात्री बसलेला हा धक्का यामीनला फार मोठा होता.

आपली फसवणूक झालीये हे पहिल्याच दिवशी कळूनही यामीन हनीमूनला गेला. पण त्याच्या मनात विचारांचं वादळ सुरू होतं. नेमकी आपल्या आयुष्यात काय चाललंय हे त्याला कळत नव्हतं. आपल्यासोबत घडलेली घटना घरच्यांना सांगणार तरी कशी या विचारात यामीन चार महिने खंगत राहिला. आपल्या गुप्तांगाची व्हर्जिनोप्लास्टी झाली असून काही दिवसानंतर सगळं ठीक होईल असं पत्नीने सांगितलं. पण त्यांच्यात वाद वाढत गेले. शेवटी पत्नी माहेरी गेली असता यामीनचे वडील त्याला समजावत होते.

नाईलाजाने यामीनने आपल्या वडिलांना घडलेला सगळा प्रकार सांगून टाकला. यामीनच्या तोंडून सारा प्रकार ऐकल्यानंतर त्यांना धक्काच बसला. यामिनच्या बाबांनी घडलेला सर्व प्रकार मुलीच्या वडिलांना सांगितला. मुलीचे वडील इमाम असल्याने त्यांनी साम, दाम, दंड, भेद वापरायला सुरुवात केली, तसेच गुंडांकडून धमकी देणे सुरू केले.आपली फसवणूक झाली म्हणून त्यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणात तक्रार दाखल करून घेतली असून यामीनच्या घरच्यांचा जबाबही नोंदवला आहे. आता यामीनच्या पत्नीचा जबाब नोंदवल्या नंतर नेमकं काय आहे त्याची माहिती पोलिसांना मिळेल. स्त्रीच्या देहात दडलेला पुरुष आणि पुरुषाच्या देहात दडलेली स्त्री हा निसर्गानं केलेला त्यांच्यावरचा अन्याय आहे. पण ते दडवून इतरांची फसवणूक करणं हा दुसऱ्यांवर अन्याय आहे. मुंबईत पहिल्यांदा असा प्रकार घडल्याने आणि पोलिसातही अश्या प्रकारची तक्रार दाखल झाल्याने पोलिस पुढचा कसा तपास करतात हेही महत्वाचं आहे.

हेही वाचा-

८ लोकांनी गरोदर बकरीवर केला सामुहिक बलात्कार

Loading...
Loading...

 पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षावाले बनले महापौर, राहुल जाधव 80 मतांनी विजयी

सासरच्यांनी विवाहितेला खांबाला बांधून जिवंत जाळलं,आरोपी अजूनही मोकाटच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 5, 2018 11:01 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close