मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

कोरोनामुळे महाराष्ट्रात 'या' जिल्ह्यांध्ये कलम 144 लागू

कोरोनामुळे महाराष्ट्रात 'या' जिल्ह्यांध्ये कलम 144 लागू

मुंबई, गोवा, पुण्यानंतर आता नागपूर आणि वर्धामध्येही जमावबंदी म्हणजेच कलम 144 लागू करण्यात आला आहे.

मुंबई, गोवा, पुण्यानंतर आता नागपूर आणि वर्धामध्येही जमावबंदी म्हणजेच कलम 144 लागू करण्यात आला आहे.

मुंबई, गोवा, पुण्यानंतर आता नागपूर आणि वर्धामध्येही जमावबंदी म्हणजेच कलम 144 लागू करण्यात आला आहे.

  • Published by:  Manoj Khandekar
नागपूर, 17 मार्च : संपूर्ण जगभरात आणि देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशात सर्वच जिल्ह्यांध्ये आणि शहरांध्ये खबरदारी म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबई, गोवा, पुण्यानंतर आता नागपूर आणि वर्धामध्येही जमावबंदी म्हणजेच कलम 144 लागू करण्यात आला आहे. आजपासून 31 मार्चपर्यंत हा कायदा लागू करण्यात आला असल्याचे आदेश सह-पोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी दिले आहेत. कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी देऊ नये असंही सह-पोलीस आयुक्तांतर्फे सांगण्यात येत आहे. या काळात कोणत्याही कार्यक्रमाला, मोर्चाला, सभेला परवानगी मिळणार नाही. ‘कलम 144’ म्हणजे जमावबंदी हा संबंध जोडला जात असला, तरी यावेळी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीसाठी हे कलम लागू करण्यात आले आहेत, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, काळजी घ्यावी, सार्वजनिक जागी किंवा समारंभात जाणे टाळावे, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. सध्या कोरोना रुग्णांची संख्या 39वर पोहोचली आहे. यातील सर्वाधिक रुग्ण हे पुण्यामध्ये असल्याने पुण्यात खबरदारीचा इशारा म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाबाधित16 रुग्णांची प्रकृती स्थिर असून 27 जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्याचं अहवालात समोर आलं आहे. पण रुग्णांचा वाढता आकडा पाहता पुण्यात बाजारपेठांसह सगळी महत्त्वाची ठिकाणी बंद ठेवण्यात निर्णय घेण्यात आला आहे. हे वाचा - लवकरच कोरोनाला सारं जग हरवणार, 'या' देशात सुरू आहे लसीची चाचणी आजपासून पुढचे 3 दिवस व्यापार बंद राहणार आहे. किराणा, जीवनावश्यक वस्तू, दूध डेरीज, औषधं, भाजीपाला, फळं वगळता इतर दुकानं बंद राहणार असल्य़ाची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पुण्यात संचारबंदी नसून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोक एकावेळी गर्दी करून उभे राहू शकत नाही. आजपासून पुण्यात या गोष्टींवर आहे बंदी - तुळशीबाग पाठोपाठ सुप्रसिद्ध हॉंगकॉंग लेन शॉपिंग ही 3 दिवस बंद राहणार आहे. - सावित्रीबाई फुले आणि पुणे विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढं ढकलल्या - ग्रामदैवत कसबा गणपतीचंही दर्शन बंद - कोर्टाचे काम फक्त 11 ते 2 असं 3 तास चालणार - येरवडा जेलमधून व्हिडिओद्वारे कैद्यांशी संपर्क करणार. कैद्यांना कोर्टात आणणार नाही - 21 दिवस चाललेलं फुरसुंगी, उरुळी ग्रामस्थांचं कचरा विरोधी आंदोलन स्थगित हे वाचा - मराठी सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं निधन
First published:

Tags: Corona, Corona virus in india, Coronavirus symptoms

पुढील बातम्या