टिकटॉक बंदीनंतर तरुणीची आत्महत्या; सरकारच्या निर्णयामुळे झाली होती अस्वस्थ

टिकटॉक बंदीनंतर तरुणीची आत्महत्या; सरकारच्या निर्णयामुळे झाली होती अस्वस्थ

गेल्या काही दिवसांमध्ये विविध क्षेत्रातून आत्महत्याच्या घटना समोर येत आहेत.

  • Share this:

मुंबई, 6 जुलै : नैराश्याच्या वाढत्या घटनांमध्ये आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या 18 वर्षांच्या मुलीने नैराश्यामुळे आत्महत्या केली आहे. ही मुलगी टिकटॉकची मोठी स्टार होती आणि या व्हिडीओ प्लॅटफॉर्मवर तिचे बरेच फॉलोअर्स होते.

पोलीस या प्रकरणाचा शोध घेत असून त्यांना अद्याप कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नाही. मात्र नुकतीच टिक टॉक बंदीनंतर ही मुलगी खूप अस्वस्थ असल्याचे समजते.

हे वाचा-भारत-चीन तणावाचा झोमॅटोला मोठा फटका; आकडा ऐकून व्हाल हैराण

मिळालेल्या वृत्तानुसार, मुलीचा मृतदेह तिच्या चुलतभावाने प्रथम पाहिला आणि त्याने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्याचवेळी कुटुंबातील काही जवळच्या सदस्यांनी पोलिसांना सांगितले की, ही मुलगी गेल्या काही महिन्यांपासून नैराश्याने ग्रासलेली होती आणि म्हणूनच कदाचित तिने हे पाऊल उचलल्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच टिक-टॉकवरील सिया कक्कड नावाच्या एका स्टारने आत्महत्या केली होती. भारत आणि चीनमधील वाढत्या तणावानंतर अलीकडेच देशात चिनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. यात टिक-टॉकचा समावेश आहे.

हे वाचा-जगाला शॉक देत 11 हजार फूटांवर पोहचले मोदी, पाहा सीमेवरचे PHOTOS

गेल्या काही काळामध्ये टीव्ही आणि चित्रपटसृष्टीशी संबंधित लोकांमध्ये सतत नैराश्य आणि आत्महत्या झाल्याचे वृत्त समोर येत आहे. टीव्ही अभिनेता मनमीत गरेवा याने राहत्या घरात आत्महत्या केली असता, क्राइम पेट्रोलमध्ये दिसणारी प्रकाश मेहताने इंदूरमधील घरात स्वत: ला गळफास घेऊन आत्महत्या केली. यासह हिंदी चित्रपटांतील मोठं नाव सुशांत सिंह राजपूत याने 14 जूनला स्वत: च्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

संपादन - मीनल गांगुर्डे

Published by: Meenal Gangurde
First published: July 6, 2020, 5:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading