मुंबईकरांच्या खिशाला कात्री, पुन्हा वाढले इंधनाचे दर

मुंबईकरांनो आज तुमच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री बसणार आहे कारण इंधनाचे दर आज पुन्हा वाढले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 28, 2018 12:26 PM IST

मुंबईकरांच्या खिशाला कात्री, पुन्हा वाढले इंधनाचे दर

मुंबई, 28 ऑगस्ट : मुंबईकरांनो आज तुमच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री बसणार आहे कारण इंधनाचे दर आज पुन्हा वाढले आहेत. पेट्रोल आज मुंबईमध्ये 13 पैशांनी महाग झालं आहे, तर डिझेलही जवळपास याच प्रमाणात महागलंय. मुंबईत पेट्रोलचा दर आहे 85 रुपये 33 पैसे तर डिझेल आज 73 रुपये 20 पैशांवर गेलं आहे. पण वारंवार इंधनाचे दर का वाढतात असाच प्रश्न सगळ्यांच्या मनात सतावत असतो.

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव वाढले आहेत आणि अमेरिका-इराण संबंधांमुळे बाजारात चिंतेचं वातावरण आहे. या कारणांमुळे इंधन महागतंय. यात भर म्हणजे भारतात इंधनावर लावले जाणारे भरमसाठ कर. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेरचं होत चाललंय की काय, अशी भावना जनतेमध्ये आहे.

तर दुसरीकडे पेट्रोल दरवाढीविरोधात आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने वरळीत आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान पेट्रेलपंपावर काळ्या रंगाची कमळाची फुलं वाटण्यात आली. ज्यात भाजप सरकारने अच्छे दिनचे स्वप्न दाखवले होते, त्या भाजपा सरकारचे बोधचिन्ह या प्रतिकात्मत आंदोलनात वापरण्यात आले. भाजपला कोपरखळी मारल्यानं नागरिकांना हे आंदोलन चांगलंच आवडतंय.

PHOTOS : हेमामालिनी ते जान्हवी कपूर, लॅक्मे फॅशन वीकमध्ये स्टार्सचा जलवा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 28, 2018 12:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close