मुंबईच्या मानखुर्दमध्ये बांधकाम सुरू असलेला पादचारी पूल कोसळला, 2 जण जखमी

मुंबईच्या मानखुर्दमध्ये बांधकाम सुरू असलेला पादचारी पूल कोसळला, 2 जण जखमी

गेल्या वर्षी 14 मार्च रोजी मुंबईतील सीएसटी रेल्वे स्थानकाबाहेर बांधण्यात आलेला फूट ओव्हर ब्रिज कोसळल्याने अनेकांचा मृत्यू झाला होता. तर 34 लोक गंभीर जखमी झाले होते.

  • Share this:

मुंबई, 30 जानेवारी : महाराष्ट्राची राजधानी (Maharashtra)मुंबई (Mumbai) येथे एक मोठी बातमी समोर आली आहे. मानखुर्द भागात काल रात्री उशिरा एक बांधकाम सुरू असलेला पादचारी पूल (Foot Overbridge) कोसळला आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे. पण पुलाच्या पडलेल्या ढिगाऱ्यामुळे पूर्ण रस्ता वाहतूकीसाठी ठप्प झाला आहे. सध्या रस्ता रिकामा करण्यासाठी पुलाचा मलबा हटवण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी हा पूल पडला त्यावेळी त्याखाली दोन वाहने उभी होती. अशा परिस्थितीत एक ट्रक आणि दुसरी कार ढिगाऱ्याखाली दबली गेली आगे. पुलाचा मलबा कापून ट्रकपासून वेगळे करण्याचे काम केले जात आहे. या कामात मदत करण्यासाठी क्रेनही घटनास्थळी पोहोचल्या आहेत. त्याचवेळी स्थानिक पोलीस हा अपघात कशामुळे झाला याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे.

गेल्या वर्षीदेखील असाच अपघात झाला होता. गेल्या वर्षी 14 मार्च रोजी मुंबईतील सीएसटी रेल्वे स्थानकाबाहेर बांधण्यात आलेला फूट ओव्हर ब्रिज कोसळल्याने अनेकांचा मृत्यू झाला होता. तर 34 लोक गंभीर जखमी झाले होते. त्याचवेळी या घटनेच्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ओव्हर ब्रिज दुरुस्त करण्याचे काम सकाळपासूनच सुरू आहे. हेच दुर्लक्ष करण्याचे कारण आहे. पुलाच्या दुरुस्तीदरम्यान हा पूल सर्वसामान्यांना बंद नव्हता. ओव्हर ब्रिजवर लोकांची हालचाल रोजची होती. यामुळे एवढा मोठा अपघात झाला.

महाराष्ट्राचे तत्कालाीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. फडणवीस यांनी महापालिकेच्या आयुक्तांशी अपघाताबाबत बोलणे केले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारचे तत्काळ मंत्री विनोद तावडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सरकार जखमींवर उपचार करेल. मंत्री विनोद तावडे म्हणाले की, पुलाच्या दुरुस्तीची गरज होती. या घटनेची रेल्वे आणि बीएमसी चौकशी करेल.

First published: January 30, 2020, 7:30 AM IST

ताज्या बातम्या