LIVE : प्रभादेवी बो मोंड टॉवरच्या आगीत अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी

LIVE : प्रभादेवी बो मोंड टॉवरच्या आगीत अग्निशमन दलाचे  दोन जवान जखमी

मुंबईच्या प्रभादेवी भागातील डी मॉन्ट इमारतीच्या 32 आणि 33व्या मजल्याला भीषण आग आगली आहे. अग्निशमन दल आग विझवण्याचे प्रयत्न करत आहे.

  • Share this:

मुंबई,ता.13 जून : मुंबईतील प्रभादेवी इथल्या बो मोंड टॉवरला लागलेली आग आता आटोक्यात आलीये. या आगीचं कारण  मात्र अद्याप अस्पष्ट आहे. इमारतीच्या 32 आणि 33व्या मजल्यावर ही आग लागली होती. या आगीत धुरामुळे दोन अग्नीशमन दलाचे जवान जखमी झाले आहे. धुरामुळे त्रास झाल्यामुळे या जवानांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

प्रभादेवी इथं बो मोंड हा टाॅवर आहे. या टाॅवरमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणसह अनेक सेलिब्रिटी आणि उद्योगपतींचे या इमारतीत फ्लॅट्स आहेत. दीपिकाचा या सोसायटीत 26 व्या मजल्यावर फ्लॅट आहे.

मुंबई फायर ब्रिगेडच्या 22 गाड्या घटनास्थळी असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. आत्तापर्यंत 95 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. पोलिस आणि फायर ब्रिगेड मिळून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी ट्विटरवरून दिली आहे.

First published: June 13, 2018, 6:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading