• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • अशी रंगली होती Cruise वर ड्रग्ज पार्टी; NCB ने छापा टाकून केला पर्दाफाश, पाहा क्रुझवरील Drug Party चा VIDEO

अशी रंगली होती Cruise वर ड्रग्ज पार्टी; NCB ने छापा टाकून केला पर्दाफाश, पाहा क्रुझवरील Drug Party चा VIDEO

क्रुझवरील ड्रग्ज पार्टीचा Inside VIDEO आला समोर, अशी रंगली होती पार्टी

क्रुझवरील ड्रग्ज पार्टीचा Inside VIDEO आला समोर, अशी रंगली होती पार्टी

Inside video of drug party: क्रुझवरील ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या पार्टीचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

  • Share this:
    मुंबई, 3 ऑक्टोबर : समुद्रात Cordelia क्रुझवर ड्रग्ज पार्टीचे (Drug party) आयोजन केलं होत. या क्रुझवर एनसीबीने छापा टाकून मोठी कारवाई (NCB raid on cruise and bust drug party) केली आहे. मुंबईहून गोव्याच्या दिशेने ही क्रुझ जाणार होती आणि तीन दिवस ही ड्रग्ज पार्टी चालणार होती मात्र, त्यापूर्वीच एनसीबीने याचा पर्दाफाश केला आहे. या क्रुझवरील पार्टीचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
    या क्रुझवरुन मोठ्या प्रमाणात ड्रग्जच्या साठ्यासह 10 जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये एका मोठ्या अभिनेत्याच्या मुलाचाही समावेश असून आता नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. या प्रकरणी अजून कोणालाही अटक नाहीये, रात्री ताब्यात घेतलेल्या सेलिब्रिटीच्या मुला व्यक्तीरिक्त इतर कोणीही सेलिब्रिटी किंवा त्यांच्या मुलांना ताब्यात घेतले नाहीये. या संपूर्ण प्रकरणात एनसीबीचे अधिकारी अधिक तपास करत आहेत अशी माहिती समोर येत आहे. "मला VIP गेस्ट म्हणून बोलावलं होतं" अभिनेत्याच्या मुलाचा दावा NCB सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ड्रग्ज प्रकरणात क्रुझवरुन ताब्यात घेतलेल्या बड्या अभिनेत्याच्या मुलाचा जबाब नोंदवण्यात आला आहे. अभिनेत्याच्या मुलाने चौकशीत सांगितले की, त्याला या क्रुझवर गेस्ट म्हणून बोलावण्यात आलं होतं आणि त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचं मानधन देण्यात आलेलं नव्हतं. केवळ आपल्या नावाचा वापर करुन इतरांना बोलावण्यात आलं होतं. एनसीबीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याच्या मुलाने चौकशी दरम्यान सांगितले की, त्याला तेथे व्हीआयपी गेस्ट म्हणून बोलावण्यात आले होते. यासाठी कोणत्याही प्रकारचे मानधन आकारण्यात आलेले नव्हते. यापूर्वी अशी माहिती समोर आली होती की जवळपास 80000 रुपये एन्ट्री फी घेण्यात आली होती. मात्र, रात्री चौकशी दरम्यान अभिनेत्याच्या मुलाने सांगितले की, आपल्या नावाचा आणि चेहऱ्याचा वापर करण्यात आला जेणेकरुन इतरांना वाटेल की इतक्या मोठ्या सेलिब्रेटीचा मुलगा क्रूझवर आहे तर आपणही क्रूझवर पार्टीला जायला हवे. कोड वर्ड वापरुन आयोजित केलेली क्रुझवरील ड्रग्ज पार्टी मुंबईच्या समुद्रात एका क्रुझवर सुरू असलेल्या ड्रग्स पार्टीचा एनसीबीने पर्दाफाश केला आहे. या क्रुझवर फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. हे क्रुझ गोव्याला निघाले होते. ड्रग्स पार्टी सुरू होताच एनसीबीने धडक कारवाई सुरू केली. NCB ला तीन दिवसांपूर्वीच याबाबतची माहिती मिळाली होती. कोड वर्ड वापरुन ही पार्टी आयोजित केली होती. RTPCR असा हा कोड असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पार्टीत सहभागी झालेल्यांनी पँटच्या शिलाईत, महिलांच्या पर्समधील हँडलमध्ये, अंडरविअरच्या शिलाईत तसंच कॉलरच्या शिलाईत अंमली पदार्थ आणले होते. अंमली पदार्थ तस्करांच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांनीच या पार्टीबद्दल माहिती दिली. या माहितीच्या आधारे एनसीबीनं छापा टाकून ही कारवाई केली आहे. काय घडलं नेमकं? एनसीबीच्या पथकाने मुंबईतील समुद्रात Cordelia या क्रुझरवर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंत घरातील आणि सेलिब्रिटीची या पार्टीला हजेरी होती. या पार्टीत अंमली पदार्थाचा वापर केला करण्यात आला अशी माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर एनसीबीच्या पथकाने छापा मारला. या कारवाईत एनसीबीने मोठ्या प्रमाणात कोकेन, ड्रग्स, एमडी ड्रग्स जप्त केले आहे. या कारवाईमध्ये अनेक जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटींना ताब्यात घेतले आहे. यामध्ये बॉलिवूडमधील एका मोठ्या अभिनेत्याच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. INSIDE STORY : मुंबईच्या समुद्रात Cordelia Cruise वर ड्रग्स पार्टी, NCB चं असं चाललं ऑपरेशन! 3 दिवस चालणार होती क्रुझवर ड्रग्स पार्टी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून एनसीबीच्या पथकांनी अनेक ड्रग्स तस्कारांचं कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे मुंबईत ड्रग्स तस्करांचे धाबे दणाणले आहे. अशाच मुंबईच्या धर्तीवरून निघून मोकळ्या समुद्रात ड्रग्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पण, एनसीबीने मोठ्या शिताफीने ही पार्टी उधळून लावली आहे. नव्या माहितीप्रमाणे हे क्रुझ आजपासून मुंबईपासून गोव्याला 3 दिवसांसाठी रवाना होणार होते. मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना इतर अधिकाऱ्यांसह प्रवासी म्हणून उभ्या असलेल्या जहाजावर पोहोचल्याची टीप मिळाली. जेव्हा जहाज मुंबईहून निघाले आणि मध्य समुद्रात पोहोचेल, तेव्हा पहिल्या पार्टीला सुरुवात झाली आणि जिथे ड्रग्जचे सेवन केले जात होते.
    Published by:Sunil Desale
    First published: